मंगळवेढा, दि.१७ : मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मंगळवेढा एसटी स्टँड येथे पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
भाविकांना राजगिरा लाडू, केळी, खिचडी ,केळी व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. या कार्यक्रमास मंगळवेढा आगार प्रमुख संजय भोसले, सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, मंगळवेढा म्युझिक क्लबचे अध्यक्ष लहु ढगे, सुरसंगम फॅमिली क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण नागणे, पत्रकार दावल इनामदार , बाळासाहेब नागणे, विलास मासाळ, औदुंबर ढावरे, समाधान फुगारे , अभियंता नामदेव काशीद ,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन डोरले, मंगळवेढा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन लक्ष्मण हेंबाडे , संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सीमा भगरे, संचालिका सुवर्णा काशीद, सुवर्णा नागणे, रेश्मा ढगे, रसिका हेंबाडे, प्र.व्यवस्थापिका करिष्मा मुलाणी यांचेसह मंगळवेढा आगारातील् चालक, वाहक, एसटी कर्मचारी तसेच अनेक भाविक व महिला उपस्थित होत्या.