माळकवठे, दि.16 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकवठे (ता.दक्षिण सोलापूर) येथे आषाढी वारीचे अवचित साधून बाल वैष्णवांची दिंडी काढण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध कोठे, माळकवठे गावच्या सरपंच जयश्री सगरे, माजी सरपंच शिवलिंग बगले, सचिव राजकुमार सगरे, दत्तात्रय कुलकर्णी, धांडुरे महाराज, दत्तात्रय लाड, मोदींन शेख, पांडुरंग लाड, अशोक लाड, धोंडाप्पा माळगे, जय हनुमान भजन तरुण मंडळ माळकवठे यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करून व विठ्ठलाच्या आरतीने दिंडी सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमांतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे वेशभूषा करून गावातून दिंडी करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी जनाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई ,गोरा कुंभार, ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज, सोपान देव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, यांची वेशभूषा दिसून आली. टाळ मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या घोषाने अवघे माळकवठे नगरी दुमदुमून गेली होती. या दिंडीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मनंदाचा उत्सव पाहायला मिळाला,फुगड्या, गवळण,भारुड, अभंग, वासुदेव गीते, यावेळेस सादर करण्यात आली. तर डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन अनेक मुली वारीला जात असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून आला.पंचाक्षरी महाराज यांच्या मंदिराजवळ एक रिंगण व पंचाक्षरी विद्यालय येथे एक रिंगण सोहळा संपन्न झाला.
ग्रामसेवक कल्पना नारायणकर यांनी मुलांना खाऊ दिला,तसेच पंचाक्षरी विद्यालयाचे प्राचार्य मलाप्पा माकने यांनी ही विद्यार्थ्यांना खाऊ दिला, याप्रसंगी मुख्याध्यापक देविदास चौधरी ,मनोहर दुपारगुडे, सोमलिंग पुजारी, जनाबाई पवार,शांतप्पा कांबळे, अशोक मिरेखोर , संजय चव्हाण, अनिता चव्हाण, सुवर्णा गाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सारिका बगले व असंख्य पालक उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या तालावर व भक्तीगीतावरणाचं रिंगण करत फुगड्या खेळत निघाल्या. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मिरेखोर यांनी केले तर आभार सुवर्णा गाडे यांनी मानले.