मंगळवेढा, दि.02 : स्व.संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय कृष्णनगर मंगळवेढा जिल्हा सोलापूर या संस्थेस आयएसओ 9001 2015 ने नुकतेच मानांकित करण्यात आलेले आहे. आयएसओ मानांकन मिळवणारे स्व.संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय हे मंगळवेढा शहर व तालुक्यातील वाचनालयामध्ये प्रथम मानकरी ठरले आहे.
वीस वर्षांपूर्वी एका खोलीत सुरू झालेले वाचनालय आज ‘ग्रंथविश्व ‘या सुसज्ज देखण्या वास्तूत स्थिरावला आहे. सध्या वाचनालयात 21000 ग्रंथ संख्या, दररोजची 18 वृत्तपत्रे ,70 नियतकालिके ,समृद्ध संदर्भ सेवा, वृत्तपत्र कात्रण सुविधा, जुनी व नवी देशी विदेशी नानीं पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह ,संगणकीय संदर्भसेवा ,अद्यावत वाचनालय दप्तर, ग्रंथालय कामकाजासाठी कलर झेरॉक्स, लॅमिनेशन सुविधा ,सुसज्ज असे सांस्कृतिक सभागृह वाचनासाठी महिला व बालकांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष ,शुद्ध पाणी व स्वच्छतागृह सुविधा, विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ,राष्ट्रीय सणा दिवशी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात . विविध संस्थांनी वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार देऊन गौरवले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेण्यात येऊन संस्थेस आयएसओ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड व संचालक संतोष गायकवाड ,शंकर धुमाळ, धर्मराज जाधव ,भारत इंगळे , लता ओमने, सविता गोवे ग्रंथालयीन कर्मचारी प्रतिभा गायकवाड ,रोहिणी गायकवाड एस.डी.पांचाळ ,सचिन ढगे हे सातत्याने ग्रंथालयाच्या प्रगतीसाठी कार्यरत असतात.
सदरच्या मानांकनानिमित्त वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे ,ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील ,लिपिक प्रदीप गाडे ,राज्यग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार, ग्रंथमित्र कुंडलीक मोरे , ग्रंथमित्र गुलाबराव पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथ मित्र विजयकुमार पवार , साहेबराव शिंदे ,सुडके,ज्ञानेश्वर कुलकर्णी अमर कुलकर्णी ,गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, विस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड ,धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या सदस्या सौ तेजस्विनी कदम हजरत काझी, अजित शिंदे यांनी केले. सदरच्या मानांकन मिळवण्यात प्रायमा संस्थेचे प्राचार्य नीलकंठ कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.