बालाजीनगर, दि.०२ : मराठी या मराठी टिव्ही वहिनीच्या माध्यमातून आज मंगळवार दुपारी तीन वाजता बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथील श्री बालाजी शिक्षण संकुलात सन मराठी आयोजित आनंदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माध्यमिक आश्रम प्रश्नाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बालाजीनगर चे प्राचार्य गणपती राजाराम पवार यांनी केले आहे.
महिलांच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा मिळावा हा मुख्य उद्देश असून या सोहळ्यात महिलांना आपल्या मधील कला सादर करायला संधी दिली जाणार असून यात उत्तम कला सादर करणाऱ्या महिलांना बक्षीस देण्यात येणार आहे. कले बरोबर महिलांसाठी खेळही खेळायला मिळणार आहे. आनंदसोहळा मधील महिलांची सादर केलेली कलागुण सन मराठीच्या माध्यमातून प्रसारित केली जाणार आहेत. भविष्यात महिलांसाठी मालिका सुरू करुन हक्काचा व्यासपीठ दिल जाणार आहे. या कार्यक्रमात महिलांच्या कला गुणांना वाव देण्यात येणार आहे. तसेच पैठणीसह भरघोस बक्षिसे व भेटवस्तू देऊन महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती आनंदी सोहळा सन मराठी टीम कडून देण्यात आली आहे.