मंगळवेढा, दि.२८ : दामाजी एक्सप्रेस वृत्तसमूहाच्या स्तंभलेखिका, वक्त्या, निवेदिका, संशोधक रेश्मा गुंगे यांच्या ‘आत्मभान’ कथासंग्रहाचे प्रकाशन आज शुक्रवार दिनांक २८ जून रोजी शिवशाही बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सकाळी १०.३० वाजता गोणेवाडी (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथे होणार आहे.
हा प्रकाशन समारंभ माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत तसेच वसुंधरा कला महाविद्यालय, जुळे सोलापूर प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे हे भूषवणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम, सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती कडलासकर, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेंअरमन राहुल शहा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सोलापूर प्रतिनिधी कल्याण शिंदे, माजी सभापती संभाजी गावकरे, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार व्हरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी आत्मभान या पुस्तकाचे अंतरंगावर प्रा. सविता दूधभाते व उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूरच्या प्राचार्या डॉ. विद्युलता पांढरे या भाष्य करणार आहेत.
सप्तर्षी प्रकाशकाने प्रकाशित केलेला या पुस्तकाला प्रा. शिवाजीराव बागल यांची प्रस्तावना तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांची पाठराखण लाभली आहे.
तरी या प्रकाशन सोहळ्यास रसिक वाचक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवशाही परिवाराच्यावतीने अध्यक्ष माणिक गुंगे व सहकाऱ्यांनी केले आहे.