आनंदी आनंद गडे…. तालिका अध्यक्ष म्हणजे काय रे भाऊ? या आमदारांना मिळालीय तालिका अध्यक्षपदाची संधी

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार आवताडे यांच्या तालिका अध्यक्ष पदावरील निवडीने मतदासंघांत उत्साह

मंगळवेढा, दि.27 : पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांचे पावसाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्षपदी निवड झाली आहे.

आपण पहिल्यांदा पाहूया की तालिका अध्यक्ष म्हणजे नेमके काय पद आहे ?
तलिका अध्यक्ष पदाची तरतूद कलम 180(2) नुसार निश्चित करण्यात आलेली आहे. सभागृहाचे अध्यक्ष हे वेळोवेळी नेमलेल्या सदस्यांची एक तालिका बनवतात. आता सध्या पाच सदस्यांची तालिका बनविण्यात आलेली आहे. सभागृहाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष सभागृहाच्या बैठकीसाठी अनुपस्थित असतील त्यावेळेस या तलिकेतील एका सदस्य बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. तालिका अध्यक्षास कार्याध्यक्ष म्हणूनही संबोधले जाते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे इतकेच या तालिका अध्यक्षांनाही अधिकार असतात. तालिका अध्यक्षांनी दिलेला अधिनिर्णय अंतिम असतो व तो बंधनकारक असतो.

आमदार समाधान आवताडे यांच्या तालिका अध्यक्ष या पदावरील निवडीने मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्यांदाच पोटनिवडणुकीमध्ये निवडून गेलेले आमदार समाधान आवताडे यांना स्वर्गीय आमदार भारत भालके, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यानंतर तालिका अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे, त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात केलेले काम पाहून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन  सुरू झाले आहे.विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड केल्याची घोषणा करण्यात आली.

यामध्ये भाजपकडून दोघांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या एका आमदाराची वर्णी लावण्यात आली आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून आमदार कालिदास कोळंबकर, समाधान आवताडे, शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लहामटे आणि काँग्रेसकडून अमिन पटेल या पाच आमदारांची निवड तालिका अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अवताडे निवडून आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून त्यांना बढती मिळाली असून विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे. समाधान आवताडे यांच्या अगोदर या मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे, तसेच विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनाही तालिका अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली होती.

प्रथमच आमदार झालेल्या आवताडे यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. अडीच वर्षाच्या कार्य काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारसंघांमध्ये निधी खेचून आणला आहे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत राज्यभर त्यांच्या कामाचा गाव गाव होत असून पक्षाने कामसू माणसाला तालिका सभागृहात पाठवून त्यांच्या कामाची दखलच घेतली असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here