मंगळवेढा, दि.18 : विठ्ठल दर्शनाची आस असताना शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा लौकिक आदर्शवत आहे, तसेच आपल्या कामातच ज्यांनी परमेश्वर पाहिला असे महान व्यक्तिमत्व असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांच्या आशीर्वादरुपी सत्काराने गेल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घकाळात कर्तव्य निष्ठेने सेवा बजावून सेवापूर्तीने सत्कारमूर्ती ठरलेले विठ्ठल दादू खांडेकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील सेवाभावी कार्य खऱ्या अर्थाने सार्थक ठरल्याचे गौरव उद्गार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी बोलताना व्यक्त केले.
आंधळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक विठ्ठल खांडेकर गुरुजी यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभा प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून धनश्री परिवाराचे नेते शिवाजीराव काळुंगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मंगळवेढा, हनुमंत कोष्टी, पोपट लवटे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मंगळवेढा डॉ. बिभीषण रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
खांडेकर गुरुजी यांच्या सेवापुर्ती निमित्त प्रदीप मोरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मंगळवेढ्याचे प्राचार्य श्रीधर भोसले, शिक्षक नेते सुरेश पवार, राहुल गेजगे, मरवडे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रतिभा दळवे- नकाते, पाटकळ केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख शामराव सरगर यांच्यासह आदींनी आपल्या मनोगत आतून शुभेच्छा दिल्या.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव नागणे, होलार समाजाचे हैदर केंगार, मधुकर भंडगे, नाथा ऐवळे, सांगली शिक्षक बँकेचे संचालक श्रीमंत पाटील, चंद्रकांत बुगडे, ज्ञानोबा मेटकरी, विठ्ठल ताटे, राजेंद्र लिगाडे, विलास नकाते, भैरू गोडसे, सिद्धेश्वर सावत, विलास ठेंगील, नागनाथ कोकरे, सुनील कोळेकर, सुषमा सुतार मॅडम पत्रकार शिवाजी केंगार,विलास मासाळ, आंधळगाव केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण आंधळगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.