मंगळवेढा, दि.18 : सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील व सुविद्य पत्नी यांनी आज विठु रखुमाईंच्या दर्शनानिमित्त पंढरपूर येथे आले असता मंगळवेढा येथील आमदार समाधान अवताडे यांच्या निवासस्थानी सहपरिवार सदिच्छा भेट घेतली. या भेटीने कॉलेज जीवनापासूनच्या मैत्रीचे नाते या मित्रांनी वृद्धींगत केले आहे.
आज निर्जला एकादशीचे औचित्य साधून सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील हे सहपरिवार पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी विशाल पाटील कॉलेज जीवनापासूनच्या मैत्रीच्या नात्याला स्मरत आमदार समाधान अवताडे यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी आमदार समाधान अवताडे यांचे बंधू उद्योजक संजय आवताडे यांच्या हस्ते पाटील परिवाराचे स्वागत पर सत्कार करण्यात आला.
स्व.वसंतदादा पाटील साहेब व स्व.आण्णा यांच्या पासून चालत आलेल्या विचारांना स्मरून आवताडे व पाटील परिवाराने नेहमीच राजकारणापलीकडचा मानवतावादी धर्म अबाधित ठेवला आहे. अगदी कॉलेज जीवनापासून मैत्रीचे घनिष्ठ संबंध आज पुन्हा भेटीने वृद्धींगत झाले.
मतदार संघातील समस्त जनतेच्या वतीने खासदार विशाल पाटील यांचे अभिनंदन करून पुढील सेवा वाटचालीस शुभेच्छा देत विठु रखुमाईंची मूर्ती देत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी तसेच विविध कार्यक्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.