शेतकऱ्यांचे होणारे हाल कदापही सहन करणार नाही ; आमदार अवताडे यांनी नगरपालिका प्रशासनास सुनावले

मंगळवेढा आठवडा बाजार मध्ये आमदार अवताडे यांची अचानक भेट शेतकरी व व्यापाऱ्याकडून जाणून घेतल्या समस्या 

मंगळवेढा, दि.१७ : मंगळवेढा शहरामध्ये भरत असलेल्या बाजार मध्ये नागरिकांच्या सोयी सुविधा कशा आहेत हे पाहण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सोमवार आठवडा बाजार दिवशी पाहणी करून व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना व ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार आवताडे यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत शेतकऱ्यांचे होणारे हाल कदापही सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.

व्यापारासाठी व शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या बाजार कट्ट्यावर अनेकांनी खोकी टाकली आहेत,वाहने लावले आहेत व शेतकऱ्यांना खाली चिखलात बसावे लागत आहे याबाबत नगरपालिकेच्या प्रशासनास जाब विचारत तुमचे बाजारवर व कामावर लक्ष असते का? ग्रामीण भागातून बाजार साठी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अजिबात त्रास होता कामा नये,अशा शब्दात मुख्याधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

सध्या पाऊस सुरू असल्यामुळे बाजार आवारामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे पूर्ण बाजारामध्ये सिमेंट काँक्रीट केले असतानाही त्यावर नगरपालिकेने मुरूम टाकून अकलेचे तारे तोडले आहेत अनेक ठिकाणी पाणी साठत असून भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना बसण्यास अडचणी होत आहेत त्यामुळे बाजार कट्ट्यावरील केलेले अतिक्रमण काढून बाजार व्यवस्थित शेडमध्ये भरवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. त्याचबरोबर व्यापारी महिला व बाजारला येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे त्यावरही ताबडतोब उपाययोजना करा त्याचबरोबर आठवडा बाजार मध्ये अजून काही निधीची कमतरता आहे का? आठवडा बाजार मध्ये साठत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करून द्या ताबडतोब निधीच्या तरतूद करतो मात्र शेतकऱ्यांचे होणारे हाल कदापही सहन करणार नाही अशा शब्दात नगरपालिका प्रशासनास सुनावले. बाजारला येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनास व्यवस्थित पार्किंगची सोय नगरपालिकेकडून करण्यात आली नाही रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा होत आहे याबाबत पोलीस प्रशासनाची खडसावून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा सूचना दिल्या. आमदार समाधान आवताडे यांनी अचानक आठवला बाजार मध्ये जाऊन पाहणी करत व्यापारी ग्राहक यांचे विचारपूस केली त्यावेळेस पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांची तारांबळ उडाली. यावेळी त्यांच्यासोबत प्रशासन अधिकारी साळुंखे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, शेतकरी संघटनेचे युवराज घुले, पोलीस निरीक्षक रणजीत माने, महादेव जाधव, सचिन शिंदे उपस्थित होते.

मंगळवेढा शहरासाठी कोट्यावधीचा निधी आणला असून अद्याप टेंडर होऊनही काही ठेकेदाराने कामे सुरू केली नाहीत. ती कामे तात्काळ सुरू करावीत जे ठेकेदार कामे सुरू करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा पण तात्काळ कामे सुरू करा असा सूचनाही आमदार समाधान आवताडे यांनी नगरपालिका प्रशासन दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here