मंगळवेढा,दि.12 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी मरवडे येथे सदिच्छा भेट देऊन शिक्षक बांधवांशी संवाद साधला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांच्या मरवडे येथील निवासस्थानी भेट देऊन मरवडे व परिसरातील शिक्षक बांधवांशी संवाद साधला. यावेळी गावातील शिक्षक बांधवांच्या वतीने कोंबे यांचा मोहन मासाळ यांच्या हस्ते तर वर्धा जिल्हा शिक्षक समितीचे कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंभोरकर यांचा चंद्रकांत पवार यांच्या हस्ते मानाचा फेटा , शाल, श्रीफळ व जिल्हा शिक्षक समितीची कार्य अहवाल पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कोंबे यांनी १५ जून रोजी होणारे राज्यव्यापी आंदोलनाच्या निमित्ताने ऐरणीवर आलेले प्रश्न , वेतन त्रुटी निवारण समितीकडे देण्यात येणारे मुद्दे तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन केले .शिवाय निवड श्रेणी , कॕशलेस आरोग्य सुविधा , आश्वासित प्रगती योजना तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पद जाहीरात निघालेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेसाठी विकल्प भरुन घेणे इत्यादी बाबतीत कार्यकर्त्यांच्या मनातील शंकाचे समाधान यावेळी त्यांनी केले.
यावेळी डाॕ.आश्विनी प्रविण शिवशरण हिने एम. बी.बी.एस. ही वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल तसेच रावसाहेब सुर्यवंशी यांना मरवडे मुले शाळेत मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेबद्दल दोघांचाही कोंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक समितीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष विठ्ठल ताटे , उपाध्यक्ष मधुकर पाटील , ज्येष्ठ मार्गदर्शक महिपती अनुसे , माजी चेअरमन चंद्रकांत पवार , सुभाष मासाळ , नवनाथ जाधव , दशरथ गणपाटील , रावसाहेब जाधव , प्रविण शिवशरण , अरुण सरडे , सिद्धण्णा कोळी , नितीन साठे , बंडू पवार , संजय पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते .