मंगळवेढा, दि.10 : अखिल भारतीय होलार समाज संघटना समाजाच्या न्याय हक्कासाठी अखंडितपणे कार्यरत आहे, समाजाच्या लागलेल्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्त व्हाव्यात,होलार समाज अभ्यास आयोग निर्माण व्हावा या प्रमुख मागणीसाठी अनेक आंदोलने, मेळावे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री यांचे उंबरटे झिजवून पाठपुरावा केला. तरीही समाजाच्या पदरी नैराश्य मिळाले. या पुढील काळात समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी तरुणाईने समोर यावे, एकजुटीने केलेला उठावाचा आवाज मंत्रालयात घुमावा, यासाठी नव्या उमेदीने व जोमाने समाज संघटनेच्या चळवळीला टोकाची धार मिळावी, यासाठी समाज संघटनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय नेते एकनाथ जावीर व प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
देवभूमी असलेल्या पंढरपूर येथे जुन्या एसटी स्टँड समोर पंढरपूर इन या हॉलमध्ये सकाळी 11 वाजता समाज संघटनेच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे.तरी सर्वानी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन समाज संघटनेचे राष्ट्रीय सचिव हैदर केंगार यांनी केले आहे.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत गुळीग, राष्ट्रीय सरचिटणीस हैदर केंगार, राष्ट्रीय उपाध्यक्ष पांडुरंग ऐवळे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर भंडगे, प्रदेश सांस्कृतिक विभाग प्रमुख रणजीत ऐवळे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील ढोबळे, माळशिरस तालुकाध्यक्ष दिनेशे जावीर,आटपाडी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष शिवाजीराव केंगार,प्रा. ज्ञानदेव गुळीग, किसन ढोबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाजीराव केंगार, संरक्षण प्रमुख बापूदादा ढोबळे, बारामती चे मनोज केंगार माजी तालुका अध्यक्ष बापूराव ऐवळे ,तालुका सचिव विकास केंगार ,सरचिटणीस राजू भंडगे, जिल्हा सदस्य हनुमंत बिरलिंगे, यांचे सह अनेक जण उपस्थित होते.