श्रीकांत मेलगे / ब्युरो चीफ, झेप संवाद न्यूज
सोलापूर, दि.09 : मराठा विद्यार्थ्यांना आपल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी होते याबाबत बहुतांश विद्यार्थी यांच्या मनामध्ये संशकता आहे. जर आपल्याकडे एसईबीसी प्रमाणपत्र असेल तरही आपली या प्रमाणपत्राची जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी होऊ शकते.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील व शहरातील आपले सरकर सेवा केंद्र व शासकीय कार्यालयात संपर्क साधला असता मराठा समाजासाठी जे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे फक्त नॉन क्रिमीलेअर असून ते जात प्रमाणपत्र नाही असे सांगून त्यामुळे आपली जात प्रमाणपत्र वैधता होऊ शकत नाही असे सांगितले जाते. मराठा समाजाला जे प्रमाणपत्र आहे त्यावर स्पष्टपणे कास्ट सर्टिफिकेट असा उल्लेख असताना इतरांची प्रमाणपत्र पडताळणी होते तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांची का जात पडताळणी होऊ शकत नाही याबाबत झेप संवाद न्युजने सोलापूर शहरातील सात रस्ता येथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनातील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाला भेट देऊन तेथील विधी विभागात संपर्क केला असता मराठा समाजातील विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी होऊ शकते असे सांगितले. तसेच आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क केला असता आपली जात पडताळणी होत नाही असे त्यांना सांगितल्यानंतर जे असे म्हणतात ते अज्ञानी आहेत असेही आम्हाला त्यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील उच्च शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता असते. अगोदर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व भटक्या जाती व जमाती यांची जात प्रमाणपत्र पडताळणी केली जात होती. आता मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी एसईबीसी प्रमाणपत्र काढले आहे त्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळणी होऊ शकते.
सध्या बारावीचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांनी नीट व एमएच सीईटी परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपली जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी आपणाकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
1. एसईबीसी प्रमाणपत्र ज्यामध्ये पार्ट अ कास्ट सर्टिफिकेट असा उल्लेख आहे तर पार्ट ब मध्ये नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट उल्लेख आहे. (मूळ प्रत)
2. विद्यार्थ्याचे आधार कार्ड
3. विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर
4. विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी
5. विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला
6. वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
7. आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला ,
– आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर जवळच्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला ( हे नाते आपल्या वंशावळ प्रमाणपत्रावर नातेसंबंध दर्शवणारे असावे. (मूळ प्रत)
8. साध्या कागदावर वंशावळ ( जी वंशावळ तहसील कार्यालय किंवा नोटरी यांनी प्रमाणित केलेली असावी.
9. साध्या कागदावर शपथपत्र नमुना 17 (जे शपथपत्र तहसील कार्यालय किंवा नोटरी यांनी प्रमाणित केलेली असावी.)
10. आपले नीट किंवा एमएच सीइटी परीक्षा गुणपत्रक
अशी सर्व कागदपत्रे घेऊन आपण कोणत्याही ऑनलाइन केंद्रावर जाऊन जात प्रमाणपत्र पडताळणी फॉर्म भरू शकता व तो फॉर्म भरल्यानंतर सर्व कागदांची साक्षांकित प्रत व सोबत मूळ प्रत घेऊन जिल्हा जात प्रमाण प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय, डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता सोलापूर येथे प्रस्ताव दाखल करू शकता. प्रस्ताव दाखल केल्यानंतर आपणास थोड्याच कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
जे विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील नाही त्यांनी आपल्या संबंधित जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे संपर्क साधून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.