मंगळवेढा, दि.31: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे समाजातील सामान्य घटकांच्या सर्वांगीण कल्याणाचे आणि उद्धाराचे केंद्रस्थान होते असे गौरवोद्गगार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहेत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत असताना त्यांनी सांगितले की, कुशल प्रशासक म्हणून राज्यकारभार करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचा मोठा प्रसार केला. त्यांनी घालून दिलेल्या या सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणांचा अवलंब करण्यासाठी व धनगर समाजातील गोर-गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षण टक्का वाढवण्यासाठी तालुक्यामध्ये भव्य-दिव्य वसतीगृह उभारणे काळाची गरज आहे. सदर वसतीगृहासाठी आपण जागा उपलब्ध करा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपणास लागेल तेवढा निधी मिळवून देतो अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी ते उत्तर भारताची सम्राज्ञी हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता मुलगा पती आणि सासऱ्याच्या निधनानंतर त्यांनी परिस्थितीवर मात करून मोठ्या हिमतीने राज्यकारभार चालवला व विहिरी बारवा घाट मठ मंदिरांचा जिर्णोद्धार केला. इंदूरच्या राज्यावर राघोबा दादा पेशवे चालून आले असताना त्यांनी त्यांना लिहिलेले खरमरीत पत्र आज ही त्यांच्या शौर्याची साक्ष देते. अहिल्यादेवी होळकर राघोबांना म्हणाल्या, माझ्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे माझा पराभव झाला तर एका स्त्रीचा तो पराभव असेल परंतु राघोबा दादा तुमचा पराभव झाला तर एका महिलेने तुमचा पराभव केला आम्ही तुम्हाला चोळी बांगडीचा आहेर पाठवू तुम्हाला साखळदंडाने हत्तीच्या पायी बंधून इंदूरमध्ये फिरवू असे खरमरीत पत्र लिहिल्यानंतर राघोबा दादा वरमले आणि आपल्या सैन्य घेऊन माघारी फिरले.
अशा लढवय्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास असल्याचेही त्यांनी नमूद केले त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगे चारधाम आणि हिंदू तीर्थक्षेत्रांचा त्यांनी कायापालट घडवून आणला वनराई आमराई उभ्या करून राज्यामध्ये वृक्ष लागवड केली नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या एका सत्वशील महिलेप्रमाणे ते जीवन जगल्या त्यांच्या कार्याचा आदर्श सगळ्यांनी जोपासवा सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर इंदूरहून महेश्वरला राजधानी केले एका सुनियोजित शहराची निर्मिती केली. त्या शहरात विणकर रस शाळा शस्त्र निर्मिती शेती अवजाराच्या निर्मितीचे कारखाने उभा केले आपल्या अभ्यासपूर्ण प्रश्न त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोक कल्याणकारी राज्याचे बद्दल त्यांनी सदर प्रसंगी माहिती दिली.
यावेळी माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा चेअरमन अनिल सावंत, युवक नेते तानाजी काकडे, शिवसेना तालुकाध्यक्ष पै.अशोक चौंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे, उद्योजक दत्ताभाऊ साबणे, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
आधुनिक काळातील पुढारलेल्या या युगामध्ये सुद्धा धनगर समाजातील अनेक होतकरू युवक-युवती शिक्षणाची आवश्यक साधने उपलब्ध नसल्यामुळे आज ही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सदरची ही बाब लक्षात आल्यानंतर व या समाजाची अनेक दिवसांपूर्वींची वसतिगृहाची मागणी लक्षात घेऊन आमदार आवताडे यांनी सांगितले की, या वास्तूच्या उभारणीसाठी आपण समाज बांधवांच्या एक पाऊल पुढे राहून कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. सदर वसतीगृह बांधव कामासाठी या समाजातील मंडळींनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर याची कार्यवाही सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी मी नेहमीच त्यांच्यासोबत असेन असा विश्वास आमदार आवताडे यांनी दिला आहे.