सोलापूर, दि.30 : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आठव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता शहरातील एच.आय.व्ही बाधीत ३५ विद्यार्थ्यांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने गेल्या ८ वर्षात गरिब, निराधार व झोपडपट्टी , कामगार वसाहतीत राहणाऱ्या लोकांना व रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना, अपंग व अंध असे विविध घटकांना अन्नधान्य वाटप करून वर्धापनदिन साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली. यावर्षी लष्कर जवळील आदर्श दुध डेअरी येथे मान्यवरांच्या हस्ते एच आय व्ही. बाधीत ३५ विद्यार्थ्यांना गहू, मटकी, साखर, तांदूळ, शेंगा व गुळ प्रत्येकी एक किलो असे एकूण सहा किलोचे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबचे मेंबर कविता डागा, सोलापूर जिल्हाचे रोटरी संचालक राकेश उदगिरी, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बंग, नेटवर्क आँफ सोलापूर बाय पिपल विव्हिंगचे संस्थेचे अध्यक्ष आनंद लांडगे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूरातील दानशूर व ग्रुप मेंबर व्यक्तीच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले.
सुत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश येळमली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल वर्कर सचिन राठोड, महेश ढेंगले, संतोष अलकुंटे, केशव भैय्या, महेश भाईकट्टी, शिवानंद भाईकट्टी, विजयश्री आमले, अनिता बनसोडे, आरती रेड्डी, सुनाबी शेख, अक्षता कासट, शुभांगी लचके, भारती जवळे, तृप्ती पुजारी आदींनी परिश्रम घेतले.
■ ८ वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविले : महेश कासट
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान गेल्या ७ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येते. लाँकडाऊनमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांना जेवण दिले. तसेच काढा वाटप केले. पोलीस, डॉक्टर व स्वच्छता कर्मचारी यांना कोरोना योध्दा म्हणून गौरविण्यात आले. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, कम्पासपेटी व प्रशनपत्रिका मोफत वाटप करण्यात आले. विविध स्पर्धा घेतल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येते, असे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.