बालाजीनगर, दि.29 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी व दहावीच्या परीक्षेत बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथील श्री बालाजी शिक्षण मंडळ, बालाजीनगर संचलित माध्यमिक आश्रम प्रशाला, कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. आश्रम शाळेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विज्ञान शाखेच्या तनिष्का प्रकाश स्वामी हिने 86.33 टक्के गुण मिळवत केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दहावीचा निकाल 98.79 टक्के लागला असून प्रणाली नाना नरळे हिने 92.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत कार्यरत असणाऱ्या कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बालाजीनगरचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक – स्वामी तनिष्का प्रकाश – 86.33% हिने, द्वितीय क्रमांक- मोरे अभिजित अविनाश 81.17% याने तर तृतीय क्रमांक चौगुले ऋतुजा काका- 80% हिने मिळविला.
कला शाखेतून प्रथम क्रमांक – वाघमारे माया अंकुश- 79.67% हिने, द्वितीय क्रमांक- वाघमारे लक्ष्मी अंकुश -76% हिने तर तृतीय क्रमांक पवार नेहा रमेश -72.67% हिने पटकाविला.
शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या ज्युनिअर कॉलेज, बालाजीनगर येथील कला शाखेचा निकालही 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक- पवार अपूर्वा विजय – 70.67% हिने द्वितीय क्रमांक काळू लक्ष्मी चंद्रकांत – 69.50% तर तृतीय क्रमांक – पवार काजल अनिल – 69.00% हिने मिळविला.
दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक- प्रणाली नानासो नरळे – 92.40%, द्वितीय क्रमांक- हिरके सविता बसवराज – 88.20 % तर तृतीय क्रमांक – नदाफ सानिया मस्तान – 85.40% व राठोड अंजली शिवाजी -85.20 % यांनी तर चतुर्थ क्रमांक कोटी रुपाली बिरू – 85.20% हिने मिळविला.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे श्री बालाजी शिक्षण मंडळ बालाजीनगरच्या अध्यक्षा श्रीमती तुळसाबाई लालसिंग रजपूत, मार्गदर्शक उत्तमसिंग लालसिंग रजपूत, अमरसिंग लालसिंग रजपूत, उपाध्यक्ष प्रा.शिवलाल जाधव, सचिव राहुल रजपूत, सहसचिव आप्पासाहेब पाटील, संचालिका वैशाली रजपूत,संचालक हरिश्चंद्र राठोड, आप्पासाहेब मोची, पोमा रजपूत, प्राचार्य गणपती पवार, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार, महिला अधिक्षिका संगीता राठोड- पवार व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.