पुणे, दि.25: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परिक्षेचा निकाल सोमवार दि.27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल.
महाराष्ट्र राज्य पक्ष माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा अगदी यशस्वीरित्या घेतल्या होत्या यावेळेस दहावी बोर्डाच्या परीक्षा 01 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत संपन्न झाल्या.
mahresult.nic.in वर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पाहू शकता. याशिवाय, विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या इतर वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. खाली वेबसाइट्सची यादी आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्र 10 वीचा निकाल 2024 मिळू शकेल.
mahahsscboard.maharashtra.gov.in
mahresult.nic.in
results.gov.in
results.nic.in
Sscresult.mkcl.org
mahahsc.in
mahahsscboard.in
दहावीचा निकाल 2024 कसा तपासायचा?
mahresult nic या ऑफिसिअल वेबसाइटवर विद्यार्थी 10 वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 ऑनलाइन पाहू शकतील. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून, विद्यार्थी इयत्ता 10 वी साठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 पाहू शकतात.
mahresult.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मेन पेजवर ‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2024’ साठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
सबमिट करण्यासाठी ‘निकाल पाहा’ बटणावर क्लिक करा.
2024 मध्ये तुम्हाला mahresult.nic.in वर 10 वीचा निकाल मिळेल.
तुमच्याकडे निकाल प्रिंट करण्याचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय सुद्धा आहे.
या ऑनलाईन निकालानंतर मूळ गुणपत्रिका कधी मिळणार यांची दिनांक महाराष्ट्र बोर्डाकडून स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे.