सोलापूर, दि.20 : आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल को ऑप बँक लि सोलापुर च्या माध्यमातून आई योजनेस कर्ज पुरवठा करण्यात येत असून या योजनेचा जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस यांनी केले आहे.
कृषी पर्यटन केंद्र,हॉटेल व्यवसाय,रेस्टॉरंट, कॅफे,उपहार गृह, फास्ट फूड, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, टूर ट्रॅव्हल्स एजन्सी, आयुर्वेद- योगा केंद्र, हाऊस बोट, टेंट हाऊस, पर्यटन व्हीला, साहसी पर्यटन केंद्र, होम स्टे, रिसॉर्ट, ट्री हाउस असे पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसायाचा समावेश होतो.
आई योजने अंतर्गत रु.15 लाख पर्यंत च्या कर्ज रकमेवर पर्यटन विभागाच्या वतीने 12 % व्याजाचा परतावा हा लाभार्थ्याला त्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे. या योजनेकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ॲक्ट, उद्योग आधार,प्रकल्प अहवाल इ.कागदपत्रे पूर्तता करणे आवश्यक आहे.
लोकमंगल बँक सोलापूर मुख्य शाखेमध्ये आई योजनेच्यासाठी एक खिडकी च्या माध्यमातून सर्व माहिती व ऑनलाईन मंजुरी करून देण्याचे सेवा सुरू केली आहे. याचा बँकेच्या सर्व ग्राहकांनी व नागरिकांनीं लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी- सुदन सुरवसे मो-9975999974, निशांत देवडकर मो-992304455, राजाराम पवार मो-9923888680, विनायक यरगल मो-9850101489 यांच्याशी संपर्क साधावा असे आवहन करण्यात आले आहे.