प्रतीक्षा संपली… बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ; असा पहा आपला ऑनलाईन निकाल

पुणे, दि.20: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या मंगळवार दि.21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र राज्य पक्ष माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षा अगदी यशस्वीरित्या घेतल्या होत्या यावेळेस बारावी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च च्या कालावधीत संपन्न झाल्या तर यावर्षी बारावीच्या परीक्षेत एकूण 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

mahresult.nic.in वर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल ऑनलाइन पाहू शकता. याशिवाय, विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या इतर वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. खाली वेबसाइट्सची यादी आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 मिळू शकेल.

mahahsscboard.maharashtra.gov.in
mahresult.nic.in
results.gov.in
results.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsc.in
mahahsscboard.in

बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा?

mahresult nic या ऑफिसिअल वेबसाइटवर विद्यार्थी 12वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 ऑनलाइन पाहू शकतील. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून, विद्यार्थी इयत्ता 12वी साठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 पाहू शकतात.

mahresult.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मेन पेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल 2024’ साठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
सबमिट करण्यासाठी ‘निकाल पाहा’ बटणावर क्लिक करा.
2024 मध्ये तुम्हाला mahresult.nic.in वर 12 वीचा निकाल मिळेल.
तुमच्याकडे निकाल प्रिंट करण्याचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय सुद्धा आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अर्जावर त्यांच्या आईचे नाव दिलेले नाही त्यांनी 2024 मध्ये mahresult.nic.in वर त्यांचा HSC निकाल तपासण्यासाठी दुसऱ्या फील्डमध्ये XXX टाकावा.
Maharashtra HSC Result 2024 via SMS In Marathi

खाली दिलेला एसएमएस फॉरमॅट टाइप करून विद्यार्थी महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे पाहू शकतात. महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल 2024 पाहण्यासाठी दिलेल्या स्टेप फॉलो करा.

MHHSCSEAT NO.
Send it to 57766.
The Maharashtra HSC result 2024 will be sent on the same number as SMS.

या ऑनलाईन निकालानंतर मूळ गुणपत्रिका कधी मिळणार यांची दिनांक महाराष्ट्र बोर्डाकडून स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here