शिक्षक बदल्यासाठी सेवेची अट दूर करावी – सोलापूर जिल्हा शिक्षक समितीची मागणी

सोलापूर, दि. १३ : सध्या सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना त्याच्या विकल्पानुसार बदलीची एक संधी देण्यासाठी शालेय शिक्षण व ग्रामविकास मंत्रालयाने निर्गत केलेले शासन निर्णय विचारात घेऊन विनाअट बदल्या कराव्यात अशी मागणी शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली .

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व शिक्षणाधिकारी कादर शेख यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षक समितीच्या मागणीनुसार संभाव्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले . मात्र यामध्ये सुरुवातीला मुख्याध्यापकांच्या बदल्या त्यानंतर पदोन्नती करावी अशी मागणी करण्यात आली. या दोन्ही प्रक्रिया राबविल्यानंतर उपशिक्षकांची बदली अशा क्रमाने नियोजन केल्यास सर्वांची सोय होईल ही भूमिका मांडण्यात आली. या सूचनेला दोन्ही अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली .

शिवाय जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना शालेय शिक्षण विभागाकडील दि. २१ जून २०२३ व ग्रामविकास विभागाकडील दि. ११ मार्च २०२४ चे परिपत्रक विचारात घेऊन बदली ईच्छूक शिक्षकांना सेवेची अट न ठेवता बदलीची संधी द्यावी अशी मागणी केली . शिवाय सदरहू बदली संदर्भात जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम असून तो दूर करण्यासाठी स्वयंस्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील , शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या बदल्यासाठी सोयीस्कर धोरण राबविण्याची ग्वाही दिली .

यावेळी झालेल्या चर्चेत समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत , जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर , अमोघसिद्ध कोळी , डाॕ.रंगनाथ काकडे , जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर , कार्यकारी अध्यक्ष सुनिल कोरे , मो.बा. शेख , कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव यांनी चर्चेत भाग घेतला . यावेळी शिक्षक समितीचे पदाधिकारी संजय पाटील, अन्वर मकानदार , मोहन बाबर , सचिन गावसाने , रमेश साठे , शेखलाल शेख , महिपती अनुसे , अशोक जगदाळे , वासुदेव बाबर , दत्तात्रय बोबलादे , केशव अभंगराव , परमेश्वर गायकवाड , शिवाजी बनसोडे , संतोष रुपनवर , नागेश सिताप , विकास वाघमारे , भारत हंबीरराव , बाळासाहेब काटे , भिमण्णा कट्टीमणी , सिद्धण्णा कोळी , तुकाराम मुचंडे , संजय मेसे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here