मंगळवेढा, दि.09 : मरवडे (ता. मंगळवेढा) येथील रहिवासी व सध्या धुळे येथील विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम वाय वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य आणि डॉ. डी. एस. शहा विज्ञान महाविद्यालयातील प्राचीन भाषा विभागाचे प्रा. बाळासाहेब गणपाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आलेली आहे.
प्रा. बाळासाहेब गणपाटील यांनी “कवी वत्सल ‘हाल’ संकलित गाथा सप्तशती मधील स्त्री जीवन” या विषयावर त्यांच्या पीएच.डीचे संशोधन केले आहे. सोलापूर येथील वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाचे डॉ.महावीर शास्त्री हे त्यांचे मार्गदर्शक होते. मौखिक परीक्षेसाठी डॉ. व्ही. जी. कोरे, डॉ. बाळासाहेब भगरे, डॉ. आर. टी. पाटील उपस्थित होते.
प्रा. बाळासाहेब गणपाटील यांच्या या यशाबद्दल विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड, सेक्रेटरी युवराज करनकाळ, उपाध्यक्ष केशव बहाळकर, व्हा. चेअरमन उदय शिनकर, जगदीश गायकवाड, प्राचार्य डॉ. मधुकर वानखेडे, उपप्राचार्य डॉ. विजय भुजाडे, डॉ. योगेश पाटील व डॉ. राजवीरेंद्रसिंग गावित यांनी अभिनंदन केले आहे.