प्रा. अंकुश गायकवाड यांची स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

सोलापूर, दि.05 : स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी माध्यमिक आश्रमशाळा व ज्यु.काॅलेज,येड्राव येथील ज्युनिअर कॉलेज विभागात कार्यरत असलेले प्रा.अंकुश रामचंद्र गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीचे पत्र देताना शिवसेना जिल्हाध्यक्ष ( शिंदे गट) मनिष आण्णा काळजे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उद्योजक अजयकुमार करंडे, जगदंबा उद्योग समूह,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक संजय भगवान रणदिवे, विश्वकर्मा योजना,महाराष्ट्र राज्य प्रमुख,स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ, प्रा. किशोर घुले, प्रा.गंगाधर पडणुरे,प्रा.गोरक्ष जाधव, प्रा.भालचंद्र काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा.अंकुश गायकवाड यांची स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबददल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here