मंगळवेढा, दि.१२: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा दामाजीनगरच्या महिला विभाग प्रमुख तथा स्तंभलेखिका भारती धनवे लिखित दर्शनमात्रे या पुस्तकाचे प्रकाशन आज शुक्रवार दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव प्रा.डॉ.शिवाजीराव शिंदे यांचे हस्ते होणार आहे.
ढगे डिजिटल सभागृहात होणाऱ्या या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान म.सा.प. पुणेचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी हे भुषवणार आहेत तर यावेळी म.सा.प.पुणेचे दुसरे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे व मंगळवेढा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी अर्चना जनबंधु यांची प्रमुख उपस्थिती आहे. या प्रसंगी दर्शनमात्रेच्या अंतरंगावर ह.भ.प. प्रा.विश्वनाथ ढेपे व युवा साहित्यिका निकिता पाटील हे भाष्य करणार आहे.
हे पुस्तक सोलापूरच्या गौरवसाहित्यालयाने प्रकाशित केले असून त्याला संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांची प्रस्तावना लाभली असून प्रकाश जडे यांची यांची पाठराखण आहे. नाट्य, सुत्रसंचालन या बरोबर साहित्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण करणार्या भारती धनवेंचे लेखन प्रथमच पुस्तकरुपाने वाचकांसमोर येत आहे.
तरी या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन म.सा.प. दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, कार्याध्यक्ष दिगंबर भगरे, कार्यवाह संभाजी सलगर, लहू ढगे, कोषाध्यक्ष दया वाकडे, प्रा. दत्ता सरगर, डॉ.अतुल निकम, गोरक्ष जाधव, सचिन गालफाडे, पोपट महामुरे, रेखा जडे, अवंती पटवर्धन, अर्चना सलगर, मनीषा नागणे, रुपाली जाधव, सुवर्णा काशीद, ॲड.हसीना सुतार व नागेश धनवे, येताळा नागणे परिवाराने केले आहे.