मरवडे फेस्टीव्हलमध्ये विविध पुरस्कारांचे थाटात वितरण ; डॉ. प्रा. संतोष सूर्यवंशी यांना यंदाचा मरवडेभूषण

मंगळवेढा,दि.02: मरवडे (ता.मंगळवेढा) गावयात्रेच्या निमित्ताने छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या मरवडे फेस्टीव्हल सोहळ्याचे निमित्ताने देण्यात येणाऱ्या कला, साहित्य तसेच विविध पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले. यावेळी गावचा लौकिक उंचावणाऱ्या सुपुत्रासाठी देण्यात येणारा यंदाचा मरवडे भूषण पुरस्कार प्रा.डाॕ. संतोष सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. सुर्यवंशी यांनी ‘अर्थसाक्षरता व सक्षमता ‘ हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय स्तरावर अर्थतज्ञ म्हणून लौकिक मिळविला आहे.

छत्रपती परिवाराच्या माध्यमातून गेली 24 वर्षे मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन आयोजन करण्यात येत असून मरवडे फेस्टीव्हलच्या विविध पुरस्कारांचे थाटात वितरण पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरवडे नगरीच्या सरपंच पूनम मासाळ या होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती ॲड. नंदकुमार पवार, उद्योगपती योगेश खटकाळे, प्रसिद्ध भुलतज्ञ डाॕ.राजेंद्र जाधव, भारत मासाळ, दामाजी शुगरचे माजी संचालक सचिन शिवशरण, माजी सरपंच दादासाहेब पवार, शिवाजी पवार, राहुल भोरे, साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी मरवडे सारख्या ग्रामीण भागात दीर्घकाळ अशा चळवळी चालवून छत्रपती परिवाराने महाराष्ट्रातील युवक चळवळींपुढे आदर्श निर्माण केल्याचे सांगितले तर अॕड. नंदकुमार पवार यांनी मरवडे गाव हे विविध क्षेत्रातील चळवळींचे उगमस्थान असून इथून सुरु झालेल्या अनेक बाबी राज्यभर पोहोचल्या आहेत.

मरवडे फेस्टीव्हल निमित्त स्व.मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्य गौरव पुरस्कार डाॕ.आशुतोष रावरीकर (मुंबई) ,
भारत सातपुते (लातूर), प्रा.शिवाजी बागल (पंढरपूर) यांना स्व.भागवतराव पवार कला गौरव पुरस्काराने तर हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायिका श्रीमती शकुंतला जाधव ( मुंबई ), संगीत विशाद प्रसाद पाटील ( सांगोला ) यांचा सन्मान करण्यात आला. मरवडेभूषण पुरस्कार डॉ.प्रा. संतोष सूर्यवंशी तर स्व.ठकुबाई जाधव श्रावणबाळ पुरस्कार महेश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. गौरव मूर्तींना सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा, शाल, बुके व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . यावेळी पुरस्कार प्राप्त गौरवमुर्तींच्या वतीने डाॕ.संतोष सुर्यवंशी, कवी भारत सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. गायिका शकुंतला यांनी बाबू टांगेवाला हे गीत सादर करुन रसिकांची दाद मिळविली.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्तविक संयोजक सुरेश पवार यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत रावसाहेब सुर्यवंशी, सिद्धेश्वर रोंगे, संजय सरडे, दत्तात्रय कालिबाग, गणेश जगताप, राजेश कुलकर्णी, सौरभ रोंगे, सर्जेराव पवार यांनी केले. सूत्रसंचलन निखील कुलकर्णी यांनी व आभार दत्तात्रय मासाळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here