कोमल पाटोळे यांनी जिंकली रसिक मने…

मरवडे फेस्टीव्हलला थाटात सुरुवात

मंगळवेढा, दि.28 : मरवडे (ता.मंगळवेढा) गावयात्रेच्या निमित्ताने छत्रपती परिवाराच्यावतीने आयोजित मरवडे फेस्टीव्हल सोहळ्याला थाटात प्रारंभ झाला आहे. रसिकांचा उदंड प्रतिसाद, शिट्या, टाळ्या आणि बक्षिसांची लयलूट अशा उत्साही वातावरणात पहिल्याच दिवशी कोमल पाटोळे यांच्या कलापथकाने रसिकांची मने जिंकली.

पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे उदघाटन भैरवनाथ शुगर लवंगीचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक हणमंत दुधाळ हे होते. यावेळी व्यासपीठावर येड्रावचे प्रकाश येलपले – पाटील, उपसरपंच संजय पाटील , बाळा जाधव, इंद्रजित पवार, चंद्रकांत देवकर, रविंंद्र शेणवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनिल सावंत यांनी मरवडे फेस्टीव्हलची ओळख कलावंतांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात असून या व्यासपीठाने कलावंताना संधी उपलब्ध करुन दिली आहे. ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधन ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम आयोजित करण्यात येतात हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले.

उदघाटन सत्रानंतर कोमल पाटोळे प्रस्तुत व्रत ‘लोककलेचं, लेणं महाराष्ट्राचं…’ हा मराठमोळ्या गीत संगीताचा नृत्याविष्काराने नटलेला कार्यक्रम संपन्न झाला. कोमल पाटोळे व त्यांच्या सहकारी कला पथकाने गवळणी, लोकगीते अभंग, खंडेराया तसेच मराठमोळी गीते सादर करुन रसिकांची दाद मिळविली. कोमल पाटोळे यांच्या सुरेल आवाजाला, वाद्यवृंद आणि नृत्याविष्काराची जोड यामुळे अडीच तासाहून अधिक काळ रसिकांना त्यांनी मोहिनी घातली. यावेळी ज्येष्ठ कलावंत नंदकुमार पाटोळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक संयोजक सुरेश पवार यांनी स्वागत अध्यक्ष रावसाहेब सुर्यवंशी, सिद्धेश्वर रोंगे, बाळासाहेब कदम, श्रीकांत लवटे, संजय काळे, निखील कुलकर्णी, अरुण सरडे यांनी केले. सूत्रसंचलन सचिन कुलकर्णी यांनी तर आभार समाधान ऐवळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here