मरवडेत रंगणार कुस्तीची दंगल ; लाखो रुपयांची बक्षिसे

यंदाचा मरवडे केसरी कोण होणार याकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष

मंगळवेढा, दि.२६: मरवडे (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) गावयात्रेचे औचित्य साधून जगद्‌गुरु श्री तुकाराम महाराज बीजेच्या शुभमुहूर्तावर ऐतिहासिक भव्य कुस्ती मैदान भरवण्यात आले असून बुधवार दि.२७ रोजी दुपारी तीन वाजता मरवडेत रंगणाऱ्या या कुस्तीच्या दंगलीत जागतिक विजेता व अर्जुन पुरस्कार विजेते पै. महेंद्र गायकवाड, शिरशी, व महान भारत केसरी पै. गोलू खेत्री यांच्यात दीड लाख रुपये रकमेची कुस्ती होणार आहे. यावर्षीचा मरवडे केसरीचा बहुमान कोण पटकावणार याकडे साऱ्या कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.

मरवडे येथील कुस्ती आखाड्याला शेकडो वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर हे कुस्ती मैदान पार पडते. या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र व राज्याबाहेरील मल्लही मोठ्या संख्येने सहभागी होतात. नियोजित कुस्त्याबरोबर इतरही कुस्त्यांना मोठ्या प्रमाणात गावकरी व प्रतिष्ठित मंडळी यांच्याकडून बक्षिसे दिली जातात.

दिड लाख रुपये बक्षिसांच्या मानाच्या कुस्तीबरोबर एक लाख रुपयासाठी पै. संदीप मोठे (उपमहाराष्ट्र केसरी) व पै. दादू मुलाणी (कुर्डूवाडी) यांची, ७५०००/- रुपयांसाठी पै. समीर शेख पुणे व पै. कलीचरण सोळणकर यांच्यात, ७१०००/- रुपयांसाठी पै. रवी चव्हाण (पुणे) व पै. श्रीनिवास पाथरूट (पुणे) यांच्यात, ६५०००/- रुपयांसाठी पै. एकनाथ बेंद्रे, बठाण व रोहित मुळके, सांगली तसेच ५००००/- रुपयांसाठी पै. परमेश्वर गाडे, बामणी रियाज नदाफ तर ४१०००/- तर पै. समाधान कोळी, मरवडे व गणेश बोडरे, पंढरपूर यांच्यात कुस्त्या रंगणार आहेत.

सहभागी पैलवनासाठी पुढील नियम व अटी असणार आहेत.

१) सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत १०० ते २००० रुपये पर्यंतच्या कुस्ती नेमल्या जातील. २) नंतर येणाऱ्या पैलवानांच्या विचार केला जाणार नाही. ३) पंचाचा निर्णय अंतिम राहील ४) पैलवानाच्या जिवीताची जबाबदारी स्वतःवर राहील. ५) विजेते पैलवानास ७०% उपविजेत्यास ३०% रकम देण्यात येईल. ६) कुस्ती बरोबरीत सुटल्यास दोन्ही पैलवानास ४०% प्रमाणे इनाम देण्यात येईल व २० टक्के कपात करण्यात येईल.

यावेळी मल्लसम्राट रावसाहेब मगर, रावसाहेब मगर (छोटा) (महाराष्ट्र केसरी), पै. मुझालाल शेख (महाराष्ट्र केसरी), पै. समाधान घोडके (महाराष्ट्र केसरी), पै. अस्लम काझी (अध्यक्ष कुस्तीगीर संघ सोलापूर) पै. योगेश बॉबाळे. (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) पै. संजय मगर, पै. नामदेव घडरे, पै. गोविंद तात्या पवार, पै. अतुल पाटील पै. सर्जेराव चौरे. पै. सुनील सेवतकर, प्रविण दळवी, पै. दत्ता डुबल, पै. महेंद्र देवकते, पै. सत्यवान घोडके, पै. बलभिम केंद्रे, पै. नागनाथ गायकवाड, पै. लक्ष्मण रॉणे, पै. वामन तात्या बंदपट्टे, नंदकुमार डाँचे माप्रती (बापू) याकडे. पै. मुरलीधर सरकळे, पै. आण्णा ओमणे, पै. महादेव पौजुले, पै. परशुराम चौगुले, पै. आप्पा शिंदे, पै. सहदेव लैंडवे, पै. बलवान वाकडे, पै. ज्ञानेश्वर भगरे पै. सिताराम कदम, पै. संजय बाबर, पै. अफसर शेख, पै. संभाजी शिंदे, पै. सोपान वाघमोडे, पै.बाळू बनसोडे पै. सुग्रेसेन सावंत, पै. सिताराम गावडे, पै. पांडुरंग सावंत, अनिल इंगळे, पै. दिगंबर गायकवाड, पै. दत्ता बाबर. पै. आबा मुलाणी, पै. बाळासाहेब चीरे हे हजेरी लावणार आहेत.

सिंहगड आखाडा, मरवडे, ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथे होणाऱ्या कुस्ती आखाड्याचे निवेदन हे करणार असून पै. धनाजी मदने (पुळूजवाडी) अधिक माहितीसाठी श्री. दादासो पवार (वस्ताद) Mo.९७६४५२५२८० व श्री.पै. दामोदर घुले Mo.९८९०१८७६६२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत मरवडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here