मंगळवेढा, दि.23 : मरवडे (ता.मंगळवेढा) येथे छत्रपती परिवाराच्यावतीने सलग 24 व्या वर्षी छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दि.27 पासून पाच दिवस रंगणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक , साहित्यिक व प्रबोधन करणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
तुकाराम बीजेच्या मुहुर्तावर होणाऱ्या गावयात्रेला जोडूनच छत्रपती परिवाराचे वतीने मरवडे फेस्टिव्हल सोहळा आयोजित केला जातो . यंदाच्या या सोहळ्यात बुधवार दि.27 रोजी सायंकाळी सात वाजता उदघाटन सत्रानंतर महाराष्ट्राच्या महागायिका कोमल पाटोळे, सांस्कृतिक कला पथक, मेंढापूर कलापथकाचा ‘व्रत लोककलेच लेणं महाराष्ट्राचं ! ‘ हा कार्यक्रम होईल.
मरवडे फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.28 रोजी सायंकाळी सात वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन रंगणार असून यात डॉ. संजीवनी तडेगावकर (जालना), गोविंद जाधव (लातूर), प्रा. चंद्रशेखकर मलकमपट्टे (उदगीर), विश्वास पाटील (राधानगरी), इंद्रजीत घुले (मंगळवेढा), विनोद गादेकर (धाराशीव), उमेश सुतार (करवीर), शिवाजी सातपुते (मंगळवेढा), रमेश चिल्ले (लातूर), सुर्याजी भोसले (पुळूज) हे सहभाग नोंदविणार आहेत.
शुक्रवार दि.29 रोजी सायंकाळी सात वाजता वर्तमान स्थितीवर कडक भाष्य करणारा रामपालची सतर्कवाणी उद्बोधक कार्यक्रम होणार असून सप्तखंजिरी वादक डॉ. रामपाल धारकर व सहकारी (तूरखेड, अमरावती) हे कार्यक्रम सादर करणार आहेत.
शनिवार दि.30 रोजी सायंकाळी सात वाजता शिवशाहीर रंगराव पाटील, कोल्हापूर प्रस्तूत शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंगांनी लक्षवेधी ठरलेले मुद्रा भद्राय राजते – गाथा शिवशाहीची हे महाराष्ट्रातील एकमेव महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य सादर होणार आहे.
मरवडे फेस्टिव्हलचा या सोहळ्याचा सांगता समारंभ रविवार दि.31 रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील नामवंत नृत्य कलावंतांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेने होणार होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक : 15001/-, व्दितीय क्रमांक : 10001/-, तृतीय क्रमांक : 7001/-, चतुर्थ क्रमांक : 5001/-, पाचव्या क्रमांकासाठी: 3001/- तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी : 2001/- रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
मरवडे फेस्टिव्हल सोहळ्याचा सर्व रसिकांनी आनंद घ्यावा व अधिक माहितीसाठी 7057475610 / 8830061512/ 9766146146 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.