मंगळवेढा, दि.20 : अन्न व पाणी या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे त्या प्राणी व पक्षी यांच्याही आहेत. उन्हाळा सुरू झाला की ठिकठिकाणी वाटसरूसाठी पाणपोई सुरू केल्या जातात परंतु पक्षांचे काय हा प्रश्न पाटकळच्या येथील भीमराव मोरे व अंजली मोरे या दाम्पत्यांना पडला आणि पक्षांसाठी पाणपोई ही अभिनव संकल्पना पुढे आली. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पाटकळ येथील मोरे फार्म हाऊस वर ही पाणपोई सुरू केली जाते. यावर्षीही आज जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून पक्षांसाठी पाणपोई सुरू होत आहे.
या पक्षांच्या पाणपोईचे उद्घाटन मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे अध्यक्ष मारुती वाकडे हे तर दामाजी शुगरचे संचालक महादेव लुगडे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग जावळे, आनंद बिले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भीमराव मोरे व पंचायत समितीच्या माजी सदस्या अंजली भीमराव मोरे यांनी केले आहे.