मंगळवेढा,दि.19: महाराष्ट्र योग निसर्गोपचार महामंडळ महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या. त्यामध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून मंगळवेढयातील वैद्य बबन भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य योग निसर्गोपचार महामंडळाचे अध्यक्ष वैद्य कृष्णदेव गिरी यांनी ही निवड जाहीर केली आहे. गेल्या 15 वर्षापासून वैद्य बबन भोसले यांचे योग निसर्गोपचार व आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. वैद्य बबन भोसले यांनी या क्षेत्रात योग आणि निसर्गोपचाराचे काम करत अनेक वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये चुंबक चिकित्सा, मसाज चिकित्सा, निसर्गोपचार कार्यशाळा आदींचे नियोजन त्यांनी उत्कृष्टरित्या केले होते.
योग, आहार-विहार आणि दिनचर्या या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानेही त्यांनी दिली आहेत. आहार हेच औषध हा विषय घेवून त्यांनी सोलापूर जिल्हा तसेच राज्यामध्ये अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आहे. वैद्य भोसले यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्याचा ‘आरोग्य दूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये योग व आयुर्वेद प्रचार यासाठी ते कार्यरत आहेत. या क्षेत्रातील बबन भोसले यांचा प्रदिर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची निवड महाराष्ट्र योग निसर्गोपचार महामंडळाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी करण्यात आली आहे. या निवडीबद्दल वैद्य बबन भोसले यांचे वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.