नंदूर येथे आमदार आवताडे यांच्या हस्ते नवीन विद्युत सब स्टेशन योजनेच्या कामाचा शुभारंभ

मंगळवेढा, दि.१५ : नंदूर (ता.मंगळवेढा) येथे ३३/११ के व्ही सब स्टेशन या नवीन फिडर लिंक लाईनचा शुभारंभ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न पाणीदार आमदार समाधान आवताडे हस्ते करण्यात आला.

RDSS योजनेअंतर्गत होणाऱ्या या नव्या फिडरमुळे या भागातील शेतकऱ्यांना होणारा सद्यस्थितीतील विद्युतपुरवठा आता सदर उपकेंद्रातून होणार आहेत. या सब स्टेशन निर्मितीमुळे साहजिकच शेतकरी-ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा वीजपुरवठा अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार न अवलंबता रीतसर कनेक्शन जोडणी घेऊन महावितरण विभागाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी जेणेकरून आपणास अधिक दाबाने वीज मिळेल व पुढील काळामध्ये आणखी डीपी मिळण्यासाठी सुलभता होईल असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी केले.

या विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी उपसभापती रमेश भांजे, रावसाहेब राजमाने, चनबसू येणपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर काकणकी, माजी सरपंच गणेश गावकरे, गुरय्या स्वामी, श्रीशैल्य गोडसे, माजी उपसरपंच परमेश्वर येणपे, सुमन गोडसे, श्री.गायकवाड, श्री.खेर तसेच नंदूर ग्रामपंचायत आणि बाजूच्या गावांतील सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here