शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याशी चर्चा

सोलापूर, दि.१४: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने आज गुरुवारी सायंकाळी शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

 

सुरुवातीलाच सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या, भाषा विषय शिक्षक समायोजन, मुख्याध्यापक पदोन्नती हे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न सकारात्मक भूमिका घेऊन निकालात काढून शिक्षक बांधवांना न्याय दिल्या बद्दल जिल्हा प्रशासनाचे शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी आभार मानले.

यावेळी १) शालेय शिक्षण विभागाच्या दि. २१ जून २०२३ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्या संदर्भातील दि.११ मार्च २०२४ रोजी ग्रामविकास विभागाने स्वतंत्र पत्र निर्गत केले आहे . त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी. याबाबतीत काल जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून विनंती करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून बदली प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासन विभागाकडे फाईल ठेवण्यात आली असून एक दोन दिवसांत याबाबतीत अर्ज मागविले जातील असे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले .
२) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील तालुका ते विभाग स्तरावर विजेत्या शाळांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करावा.आर्थिक तरतूद प्राप्त होताच कार्यक्रम घेण्यात येईल अशी भूमिका शेखसो यांनी स्पष्ट केली. मात्र शिक्षक समितीने प्रतिकात्मक चेक देऊन गौरव वेळेत करावा व तरतूद उपलब्ध झाल्यानंतर रक्कम रिलिज करावी अशी मागणी केली. याबाबतीत CEO यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.

३) पट संख्येअभावी कन्नड व उर्दू माध्यमातील काही मुख्याध्यापकांना पदावनत करण्यात आले होते. तथापि मुख्याध्यापक वेतनश्रेणी घेणाऱ्या या शिक्षकांना संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पात्र शाळांवर पुन्हा प्राधान्याने मुख्याध्यापक म्हणून पदस्थापना देण्यात यावी. याबाबतीत कुठलीही अडचण नाही . लवकरच आदेश काढण्याची ग्वाही दिली .

४) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहीरात निघालेल्या शिक्षक बांधवांचे जुन्या पेन्शन योजनेत सामावून घेण्यासाठी विकल्प भरुन घ्यावेत. याबाबतीत वित्त विभागाकडून मार्गदर्शन मागविले असून त्यानंतर निर्णय लवकरच घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.

५) भनिनि देयक मंजूरीस होणारा विलंब टाळण्यात यावा.
याबाबतीत श्री. आवताडे यांना सूचना करण्यात आल्या. कुठलेही देयक प्राप्त तारखेच्या क्रमानेच मंजूर होऊन तालुक्याला गेली पाहिजेत असा स्पष्ट निर्देश कादर शेख यांनी संबंधितांना दिल्या. हे प्रश्न मांडण्यात येऊन याबाबतीत उचित आदेश व्हावेत अशी विनंती करण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, मो.बा.शेख, संतोष हुमनाबादकर, बसवराज गुरव, राजन ढवण, अन्वर मकानदार , सचिन क्षिरसागर , चरण शेळके, उम्मीद सय्यद, मा. ई.पवार , ज्ञानेश्वर गुंड आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here