मंगळवेढा येथे शैक्षणिक मेळावा अन् शाळा व शिक्षक बांधवांचा गौरव

शिक्षक समितीचे नेते अनिलबापू कादे यांचा विशेष सन्मान

मंगळवेढा, दि.04: सोलापूर जिल्हा शिक्षक समिती व छत्रपती परिवार मरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा येथे भव्य शैक्षणिक मेळावा संपन्न झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शाळा व शिक्षक बांधवांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

शिक्षक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार समाधान आवताडे , माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, नूतन शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, भगिरथदादा भालके, चांदापूरी कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, दामाजी शुगरचे माजी अध्यक्ष अॕड.नंदकुमार पवार, गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे, भगरे ट्रस्टच्या प्रा.वनमाला भगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या भव्य शिक्षक मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे , राज्य नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर ,ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील , उपाध्यक्ष राजन सावंत , विलास कंटेकुरे , न.पा.मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत , पुणे विभागाचे अध्यक्ष अर्जूनराव पाटील , ज्येष्ठ नेते किरण गायकवाड , यु.टी.जाधव ,बाबा लाड , विष्णू रोकडे यांच्यासह वर्धा , सिंधूदुर्ग , कोल्हापूर , सांगली , सातारा धाराशिव , पुणे जिल्ह्यातील शिक्षक समितीचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक समितीचे नेते अनिलबापू कादे यांचा संघटनात्मक सेवेसाठी ऋणपत्र , सन्मानचिन्ह , तुळशीहार , फेटा, शाल , बुके देऊन कृतज्ञतापर भव्य सपत्निक सत्कार करण्यात आला. याशिवाय छत्रपती परिवाराच्या वतीने जिल्ह्यातील शाळा व शिक्षक बांधवांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

या सोहळ्यासाठी सुमारे दोन हजार शिक्षक बांधवांची जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थिती लाभली . हा भव्य व दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे पदाधिकारी तसेच मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here