आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा नगरपालिकेतील कामासाठी १० कोटी निधी मंजूर

मंगळवेढा, दि.२८: पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपरिषदांच्या विविध विकासकामांसाठी नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर मंजूर निधीमध्ये मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत ५ कोटी निधी तर पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी मंजूर झाला आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेसाठी मंजूर झालेली कामे व निधी- नगरपालिका शाळा नंबर दोन ते जवाहरलाल हायस्कूल ते शिवप्रेमी चौकापर्यंत रस्ता करणे ७० लाख, दुर्गामाता नगर येथे लक्ष्मण शिंदे घर ते पाराध्ये घर मेन रोड पर्यंत रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे २२ लाख, दुर्गामाता नगर येथील भारत नागणे घरासमोर रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे व दुर्गामाता नगर येथील शहा मेडिकल ते मेटकरी चहापर्यंत रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे २७ लाख, नागणेवाडी येथील लक्ष्मण साळुंखे घर ते नामदेव जावीर घर रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे २१ लाख, नागणेवाडी येथील मायाक्का मंदिर ते येताळा ऐवळे घरापर्यंत रस्ता व गटार करणे ४ लाख, नागणेवाडी येथील वैभव ठेंगील ते जलाल मुल्ला घरापर्यंत रस्ता व गटार करणे व सचिन केंगार घर ते दादा खांडेकर घर रस्ता व गटार करणे १४ लाख, सहकारी धान्य गोडाऊन ते तहसीलदार गेस्ट हाऊस पर्यंत रस्ता करणे १० लाख, सहकारी धान्य गोडाऊन ते आंबेडकर वाचनालय ते उजनी हाऊस कंपाऊंड, गटार, रस्ता करणे १५ लाख, कृष्णानगर येथील शिवकुमार स्वामी घर ते दामोदर देशमुख घरापर्यंत रस्ता व गटार करणे ३० लाख, कृष्णा नगर येथील स्व. संजय सविता वाचनालय ते मारापुर रोड पर्यंत रस्ता व गटार करणे २० लाख, हॉटेल दि प्लेस ते आंबेडकर वाचनालय पर्यंत रस्ता करणे २२ लाख, सनगर गल्ली ते नागेश दुधाळ घरापर्यंत रस्ता व गटार करणे २७ लाख, शनिवार पेठ येथील ढगे लाकूड आड्डा ते ताईआई मंदिरापर्यंत गटार व रस्ता करणे १३ लाख, कृष्ण तलाव शेजारी मुन्ना धोत्रे घर ते मरिआई नागोबा गेटपर्यंत रस्ता व गटार करणे २० लाख, मेटकरी गल्लीतील साबळे घर ते यशवंत मुद्गुल घरापर्यंत रस्ता करणे व यशवंत मुदगुल यांच्या घरासमोरील नगरपालिका जागेत काँक्रिटीकरण करणे १२ लाख, शनिवार पेठ येथील राजू जाधव ताईआई मंदिरापर्यंत रस्ता व गटार करणे व जीवन चव्हाण घर ते तानाजी मांडले घरापर्यंत रस्ता व गटार करणे १८ लाख, अकोला रोड ते कृष्णतलाव पर्यंत रस्ता व गटार करणे २५ लाख, संभाजीनगर येथील चौंडे डॉक्टर घर ते पाण्याची टाकी पर्यंत रस्ता व गटार करणे, भाऊसाहेब शिंदे घर ते रोंगे सर घरापर्यंत रस्ता व गटार तयार करणे उजनी कंपाउंड ते विष्णुपंत आवताडे घरापर्यंत रस्ता व गटार करणे १९ लाख, आवताडे गुरुजी घर ते वस्ताद कोकणे घरापर्यंत रस्ता व गटार करणे २७ लाख, आदर्श नगर येथील आंबेडकर वाचनालय ते दशरथ ओमणे घरापर्यंत रस्ता व गटार करणे १२ लाख, हजारे गल्ली येथील धर्मशाळा ते मुरलीधर चौक रस्ता करणे व धर्मशाळा ते पेंटर शिंदे घराकडे जाणारा रस्ता करणे १६ लाख, खोमनाळ नाका शौचालयासमोर काँक्रिटीकरण करणे व नाथाबा सरडे घर ते सुभाष काशीद घर रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, चंद्रकांत पडवळे घर ते सुभाष हजारे घर रस्ता करणे व शंकर हजारे घर ते चंद्रकांत हजारे वाडा रस्ता व अंडरग्राउंड गटार करणे, बुरुड गल्ली येथील महादेव माने घर ते प्रताप चव्हाण घर ते लाळे घरापर्यंत गटार बांधणे ११ लाख, इंगोले वाडा ते किरण हजारे घर ते सौमदळे वाडा गटार व रस्ता करणे २० लाख, जय जगदंबा उत्सव मंडळ येथे पहिल्या मजल्यावर अभ्यासिका बांधणे १० लाख मंजूर झाले आहेत.

 

तर या निधीअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेसाठी शहरातील विष्णुपद विकसित करणे २५ लाख, यमाई तलाव परिसरातील प्रस्तावित युद्धभूमी परिसरामधील लादीकरण करणे २० लाख, प्रभाग क्रमांक दोन पिंटू आंबरे घर ते तेंडुलकर घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, अकबर अली नगर मधील गौस नाडीवाले घर ते एम बागवान घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, उत्पात गल्ली बेणारे पाण्याची टाकी ते टोमके फोटो स्टुडिओ पर्यंत अंतर्गत रस्ता करणे १० लाख, सनगर गल्ली येथील अंतर्गत रस्ते करणे १० लाख, मंगळवेढेकर नगर मुजावर घर ते क्षीरसागर घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, जुना कासेगाव रोड विवेकवर्धनी कॉलेज जवळ मिसाळ घर ते सुनील कौलवार घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, सावता माळी मठामागे लक्ष्मी नगर येथे बंडू जुमाळे घर ते कांचन कोटी घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, इसबावी येथील नवशक्ती चौक ढोकळे दुकान ते मोरे दुकान रस्ता सुधारणा करणे १० लाख, इसबावी येथील नवशक्ती चौक संतोष शेंडगे घर ते सज्जन मलपे रस्ता सुधारणा करणे १० लाख, कृषी नगर येथील सर्वे नं १०२/१ ब मधील ओपन प्लेस सुधारणा करणे १५ लाख, येस इसबावी येथील हरी ओम रेसिडेन्सी अंतर्गत रस्ते करणे २५ लाख, इसबावी येथील विसावा मंदिर पाठीमागील जाधव सर घर ते श्रीकांत शिंदे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये विविध विकास कामे करणे १० लाख, डोंबे गल्ली सप्ताळ बोळ येथे बोअर, मोटार व पाण्याची टाकी बसवणे ३ लाख, झेंडे गल्ली येथील भुई मारुती मांडव खुडकी देवी पर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, विस्थापित नगर मध्ये ओपन प्लेस मध्ये सभामंडप व सुशोभीकरण करणे १० लाख, इसबावी येथील मोहसीन विद्यालय येथे ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे १० लाख, मनीषा नगर ओपन प्लेस मध्ये सुशोभिकरण करणे १० लाख, शहा किराणा दुकान ते भसे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, राज्य शासकीय गृहनिर्माण संस्था कर्मचारी संस्था मधील रस्ता सुधारणा करणे १२ लाख, संजय राऊत घर ते महादेव राऊत घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, सांगोला रोड ते बनसोडे मळ्याकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १० लाख, पद्मावती झोपडपट्टी मधील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे १० लाख, ज्ञानेश्वर नगर मधील झोपडपट्टीमध्ये आदिशक्ती गणेश मंदिराजवळ सभा मंडप बांधणे १५ लाख, इसवी येथील वैष्णव नगर येथील श्रीराम मॉल ते जाधव गिरणी पर्यंत रस्ता सुधारणा करणे १५ लाख बाळासाहेब शिंदे घर कॉर्नर ते संतोष गंगाथारे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, लिंक रोड अश्वमेध हॉटेल ते रघुपुष्प बिल्डिंग रस्ता सुधारणा करणे १० लाख, अनिल नगर येथील विजय मेटकरी घर ते रमेश धोत्रे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, प्रशांत परिचारक नगर येथील प्रल्हाद माने घर ते नारायण पाटोळे घर रस्ता सुधारणा करणे १५ लाख, झेंडे गल्ली येथील सुरवसे गिरण ते शिंदे नाईक घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, भारतीय स्वतंत्र सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्था ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे १० लाख, अनिल नगर येथील नागनाथ सुतार घर ते चंद्रकांत भगरे घर रस्ता व मंगळवेढेकर नगर गोडसे घर ते उन्नती रेसिडेन्सी रस्ता सुधारणा करणे १५ लाख, महात्मा फुले नगर सचिन कसबे घर ते मुख्य रस्ता सुधारणा करणे १० लाख, सचिन कांबळे घर ते अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, शिंदे नाईक नगर येथे अंतर्गत बंदिस्त गटार करणे १० लाख, गोकुळ नगर येथील जय भवानी मंदिराजवळील जागेत लादीकरण व बैठक व्यवस्था करणे ११ लाख, कृषी नगर मधील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १५ लाख, जुनी वडर गल्ली येथील राजासाहेब मंदिर परिसरात सभा मंडप बांधणे १० लाख, जुनी इस बावी शिंदेघर ते बाळासाहेब शिंदे घर रस्ता सुधारणा करणे १०लाख, परिचारक नगर मस्के मेडिकल ते काशीदघर रस्ता सुधारणा करणे १० लाख, अनिल नगर झेंडे भक्ती शक्ती चौक ते हिंदुस्थान चौक रस्ता सुधारणा करणे १४ लाख मंजुर करण्यात आलेले आहेत.

 

या मंजूर विकास कामांच्या कामांचे तत्काळ एस्टीमेट तसेच टेंडर प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी व इतर प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

या नियोजित निधी मंजुरीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या निधीची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here