पंढरपूर, दि.२८ : अर्थसंकल्पात पंढरपूर मंगळवेढा व सोलापूर जिल्हास भोपळा मिळाला आहे, विमानतळासाठी सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडली परंतू बजेट मध्ये निधी दिला नाही हि खेदाची बाब आहे. तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेढ्यातल्या उपसा सिंचन योजनेसाठी ह्या बजेट मध्ये निधी नाही दिल्यास २४ गावातली लोक कर्नाटक राज्यात जाण्याचा व लोकसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचे या गावी ठराव झाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आसून देखील उपसासिचंन योजनेस निधी मिळवण्यात अपयशी ठरले तसेच महात्मा संत बसवेश्वरांचे स्मारक व संत चोखामेळा यांच्या स्मारकास पंढरपूर विकासला एक ही रुपया निधी तरतूद केली नाही, आमदार हे भाजपचे सत्ताधारी असून आमदारांना निधी दिला जात नाही. आमदार हे पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत असा आरोप अभिजीत पाटील यांनी केला आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने ‘बजेट पे चर्चा’ अर्थात महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण डीव्हीपी स्क्वेअर, पंढरपूर येथे पंढरपूर मंगळवेढा येथील मान्यवरांसोबत पार पडले.
पुढे निवडणुका असून देखील सामान्य नागरिकांना काही देऊ शकले नाहीत. केवळ गाजर दाखविणारा हा अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी त्यांच्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाही.
अर्थसंकल्पाच्या नावाखाली सरकारने ९९ हजार कोटी महसुली तुटीचे बजेट मांडले आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारे १७ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेला. आधीच्या कामांचे आणि घोषणांचे काय झाले? किती कामे पूर्णत्वास गेली? याचा आधी शासनाने खुलासा केला पाहिजे.
कुठलेही आर्थिक नियोजन नसताना केवळ पुढील काळात येणाऱ्या निवडणुका बघून लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, असाच एकूण निष्कर्ष या अर्थसंकल्पाकडे बघून काढावा लागतो असे मतही अभिजीत पाटील यांनी मांडले.
यावेळी पंढरपूर मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे नेते, देवानंद गुंड पाटील, विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील, राजेंद्र मोरे महाराज मा.नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, पंकज देवकते, शिवसेना (उबाठा) रणजीत बागल, कर सल्लागार विश्वंभर पाटील, केदार कटेकर, उद्योजक यश उत्पाद, तुकाराम मस्के, राधेश बादले पाटील, सप्तसुंगी बँकेचे अमोल चव्हाण, गणेश बागल, प्रविण पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, कार्याध्यक्ष मुझमिल काझी, पत्रकार प्रशांत मोरे, समाधान गाजरे, ॲड. संजय रोंगे, किरण घोडके, संदेश दोशी, ॲक्सिस बँकेचे विशाल साळुंखे, विद्यार्थिनी कोमल कौंडूभैरी, ऋतुजा फाळके, मृण्मयी कोळसे, श्री. वाघमारे, नितीन पारसे, जमीर शेख यासह विविध क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, लघुउद्योजक, डॉक्टर, सी.ए., सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील तज्ञ व नागरिक उपस्थित होते.