सोलापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑनलाईन खंडपीठास मंजुरीसाठी तत्काळ प्रयत्न – केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल

सोलापूर विकास मंचच्या मागणीला केंद्रीय कायदामंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर, दि.28: सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही बऱ्याच वर्षापासून सोलापूर विकास मंचची मागणी आहे. या मागणीसाठी केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांची भेट घेतली असता सोलापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑनलाईन खंडपीठास तत्काळ मंजुरी देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील असे आश्वासन सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.

भारतात विविध न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यावधी केसेस प्रलंबित आहेत, त्यांच्या जलद गतीने न्याय निपटारा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापासून ते जिल्हा व सत्र न्यायालया पर्यंत अमुलाग्र बदल गरजेचे आहे. सामान्य तथा गरिब घटकांना न्यायालयीन प्रक्रियेची भीती न वाटता त्यांच्या मनात न्यायालयीन प्रक्रिये विषयी ठाम सकारात्मक विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. सोलापूरात गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाच्या मागणीला केंद्र सरकारच्या वतीने तातडीने मंजूरी देऊन कार्यान्वित करण्याची विनंती सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाचे ऑनलाईन खंडपीठास तात्काळ मंजुरी देण्यासाठी मी तात्काळ प्रयत्न करेन. येणाऱ्या काळात सर्व कोर्टाच्या न्यायालयीन प्रक्रिया लोकाभिमुख आणि सुटसुटीत करणार असल्याची माहिती केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिली.

यावेळी सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मिलिंद भोसले, बाबुभाई मेहता, योगिन गुर्जर ॲड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, हर्षल कोठारी, चंद्रकांत तापडिया, कल्पेश मालु, विजय कुंदन जाधव आदी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here