मंगळवेढा, ता.27 : श्री. संत दामाजी महाविद्यालय , मंगळवेढा – हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नवनाथ रघुनाथ जगताप यांना यंदाचा श्री संत कर्ममेळा ज्ञानक्रांती राज्यस्तरीय साहित्य दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्ञानक्रांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था मंगळवेढा यांच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा जोगेश्वरी मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दलितमित्र डॉ.शिवाजीराव पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर बार असोसिएशन पंढरपूरचे माजी अध्यक्ष भगवान मुळे, उदय इंगळे, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार, प्रविण घाडगे, समाजसेविका संगीता गुरव, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे,, ॲड.दत्तात्रय सरडे, गिरिधर शिवशरण आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात समाजभान राखत उपक्रमशील कार्याचा वसा हाती घेऊन समाज आणि राष्ट्रासाठी प्रकाशमान दीपस्तंभ बनलेले डॉ. नवनाथ जगताप यांच्या व्यक्तिमत्वाची उंची या पुरस्काराने अधिक वाढलेली दिसून येते. याबद्दल श्री विद्या विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.एन.बी.पवार, दामाजी संकुलातील सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व मंगळवेढ्यातील साहित्य प्रेमींनी डॉ.नवनाथ जगताप यांचे अभिनंदन केले.