आवताडे शुगरची ३१ जानेवारी पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- संजय आवताडे

मंगळवेढा, दि.26: मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि नंदुर या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील  31 जानेवारी 2024 पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता 2711 रुपये प्रमाणे संबधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आलेले आहेत. तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्याकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन  संजय आवताडे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की आवताडे शुगर चा हा दुसरा हंगाम सुरू असून पहिला हंगाम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच दुसऱ्या हंगामामध्येही शेतकऱ्यांनी आवताडे शुगर वर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पुरवठा केलेला आहे शेतकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नसून शेतकरी हितासाठीच हा कारखाना आम्ही सुरू केला आहे. चालू हंगामात आवताडे शुगरने 3 लाख 92 हजार 460 मे टन उसाचे गाळप आज अखेर केले असल्याचेही सांगितले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके व कार्यकारी संचालक मोहन पिसे उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here