सोलापूर, दि.25: जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये सांगोला महिला टिम , थ्रो बाॕलमध्ये मोहोळ महिला टिम , खो खो मध्ये दक्षिण सोलापूरची टिम , हाॕलीबाॕलमध्ये पंढरपूर टिम तसेच क्रिकेटच्या अंतिम सामन्यामध्ये माळशिरस तालुका संघ विजयी झाल्यानंतर डान्स करुन एकच जल्लोष केला.विशेष म्हणजे या क्रीडा स्पर्धेत सरपंच व उपसपंचही सहभागी झाली होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही जल्लोष पहावयास मिळाला. जिल्हा विशेष म्हणजे आज सदर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चक्क सरपंच आणि उपसरपंच यांनीही सहभाग नोंदवला आहे.आज संघांची ओळख जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी करुन घेतली.यावेळी या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद बिटचे पत्रकार यांच्या सहभागाबरोबर सरपंच व उपसरपंचही सहभागी झाल्याचे यांच्या निदर्शनास आल्यानंतर ‘अरे इकडे सरपंच तिकडे उपसरपंच, व्हेरी गुड” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशी खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट अशा स्पर्धांमध्ये चांगलाच रंग भरला.मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी रविवारी दुपारी सामन्यांना भेट देऊन खेळाडूंची संवाद साधला. टीममध्ये सरपंच व विरोधी टीम मध्ये उपसरपंचाचा सहभाग पाहून सीईओ आव्हाळे यांना आनंद झाला. यावेळी त्यांनी दोन्ही संघाचे कौतुक केले. सरपंचासाठीही सामने घ्यावेत असे मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेने स्पर्धांसाठी चांगली व्यवस्था केल्याबद्दल सरपंचांनी समाधान व्यक्त केले. आजच्या सामन्यात विजयी झालेल्या टीमने गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. खेळाडूंच्या निवास व इतर व्यवस्था प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे मैदानात तळ ठोकून असल्यामुळे सामन्यांमध्ये आणखीनच चुरस दिसून आली.
माढा क्रिकेट टिम मधून बावीचे सरपंच मुन्ना मोरे तर माळशिरस क्रिकेट टिममधून वेळापूरचे उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर यांनी सहभाग नोंदविला.सांगोला व पंढरपूर महिला टिमनी विजयी झाल्याबद्दल डान्स करुन एकच जल्लोष व्यक्त केला.महिला थ्रो बॉल मोहोळ विरूद्ध दक्षिण सोलापूर यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. महिला थ्रो बॉलमध्ये मोहोळ टीम विजयी झाली. तसेच हॉलीबॉलमध्ये पंढरपूर टीम विजयी झाली. क्रिकेट फायनलमध्ये माळशिरस संघ विजयी झाला.