मंगळवेढा, दि.25: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे दामाजीनगर शाखेचे पाचवे शिवार साहित्य संमेलन आज मंगळवेढा येथे रंगणार असून हे साहित्य संमेलन साहित्य रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. तरी साहित्य रसिकांनी संमेलनाला हजेरी लावून सहित्यानंद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रा.प्रकाश जडे यांनी केले आहे.
आज रामचंद्र नागणे साहित्यनगरीत होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठ सोलापुरचे सह कुलसचिव प्रा.डाॅ .शिवाजी शिंदे हे भूषविणार आहेत. शिवार साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून शिवार साहित्य संमेलनाचे उदघाटन आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय आवताडे यांचे हस्ते होणार आहे तर स्वागताध्यक्ष अँड.विनायक नागणे हे असणार आहेत. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. उदघाटन प्रसंगी नुकत्याच झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे स्मरणीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते, तसेच पूर्वी झालेल्या शिवार साहित्य संमेलनाच्या निमंत्रकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथाकार प्रकाश गव्हाणे हे राहणार असून यावेळी दिगंबर यादव, आशा पाटील, भारती धनवे व बालाजी मस्के हे कथाकथन करतील.
काय बाई वाचु ? कसं ग वाचु? मलाच माझी वाटे लाज! या विषयावर होणाऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जेजुरीचे शरदचंद्र पवार महावीद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.अरुण कोळेकर हे असणार असून या परिसंवादात डाॅ.दत्ता सलगर, प्रा.विश्वनाथ ढेपे, प्रा.सविता दुधभाते, दया वाकडे सहभागी होतील.
जेष्ठ कवी बदीउज्जमा बिराजदार(साबीर सोलापुरी)यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात देवेंद्र औटी, गिरीष दुनाखे, रेणुका बुधाराम, केतन नाईक, निकिता पाटील, योजना मोहिते, गौसपाक मुलाणी, सोमनाथ टकले, बबन धुमाळ, लक्ष्मण जगदाळे, डाॅ.अतुल निकम, प्रकाश महामुनी, संगीता मासाळ, गोरक्ष जाधव हे सहभागी होणार आहेत .
संमेलनात प्रेरणा प्रतिष्ठानच्या आदर्श दाम्पत्य पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यंदाचे आदर्श दाम्पत्य पुरस्कार प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभा काळुंगे, संजीव कवचाळे व जयश्री कवचाळे ,डाॅ.शाकीर सय्यद व डाॅ.शबनम सय्यद याना प्रदान करण्यात येणार आहे.
या शिवार साहित्य संमेलनाचा समारोप माजी सभापती अँड.नंदकुमार पवार यांचे हस्ते व म.सा.प. पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.