मंगळवेढा, दि.24: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे दामाजीनगर शाखेचे पाचवे शिवार साहित्य संमेलन रविवार दि.२५ फ्रेब्रुवारी रोजी रामचंद्र नागणे साहित्यनगरीत होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठ सोलापुरचे सह कुलसचिव प्रा.डाॅ .शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवार साहित्य संमेलनाचे उदघाटन आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय आवताडे यांचे हस्ते होणार आहे तर स्वागताध्यक्षपदी अँड.विनायक नागणे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने माजी नगरसेविका अनिता नागणे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी संत दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार, उपसरपंच संजय जगताप व मंगळवेढा पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड.दत्तात्रय तोडकरी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असुन यावेळी गटविकासाधिकारी शिवाजी पाटील, पोलिस निरिक्षक रणजीत माने, कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, आणि नगर- पालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संमेलना अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे यांचे अध्यक्षीय भाषण होईल.
उदघाटन प्रसंगी नुकत्याच झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे स्मरणीकेचे प्रकाशन युटोपियन शुगर्सचे उमेश परिचारक यांचे हस्ते तर दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस.चेअरमन तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर, गोपाळ भगरे, गौरीशंकर बुरकुल यांचे उपस्थितीत होईल. तसेच पुर्वी झालेल्या शिवार साहित्य संमेलनांच्या निमंत्रकांचा सत्कार विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे हस्ते व रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा यांचे हस्ते होणार आहे. या प्रसंगी भैरवनाथ शुगरचे व्हाईस. चेअरमन अनिल सावंत, उद्योजक वैभव नागणे, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी व पत्रकार समाधान फुगारे उपस्थित राहणार आहेत.
तिसर्या सत्रात कथाकार प्रकाश गव्हाणे कथाकथनाचे अध्यक्षस्थानी असतील तर उदघाटन जेष्ठ समाजसेवक डाॅ.शिवाजीराव पवार करतील यावेळी शिरोळ चे मूख्याधिकारी निशिकांत परचंडराव , यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन निलाताई अटकळे, जयमल्हार क्रीडा संकुलाचे अध्यक्ष मारुती वाकडे, जेष्ठ अभियंता विवेक पंडित उपस्थित असतील तर दिगंबर यादव, आशा पाटील, भारती धनवे व बालाजी मस्के हे कथाकथन करतील. काय बाई वाचु ? कसं ग वाचु? मलाच माझी वाटे लाज! या विषयावर जेजुरीचे शरदचंद्र पवार महावीद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.अरुण कोळेकर यांचे अध्यक्षतेखाली होईल. उदघाटन डाॅ.प्रणिता भालके या करतील. परिसंवादात डाॅ.दत्ता सलगर, प्रा.विश्वनाथ ढेपे, प्रा.सविता दुधभाते, दया वाकडे सहभागी होतील. यावेळी सीताराम महाराज शुगरच्या सीईओ डाॅ.राजलक्ष्मी गायकवाड, जिजामाता पतसंस्थेच्या चेअरमन आशा नागणे, इनरव्हीलच्या अध्यक्षा लीना विग, स्व.संजय सविता वाचनालयाच्या ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड उपस्थित असतील.
दुपारच्या सत्रात जेष्ठ कवी बदीउज्जमा बिराजदार(साबीर सोलापुरी)यांचे अध्यक्षते खाली कविसंमेलनात देवेंद्र औटी, गिरीष दुनाखे, रेणुका बुधाराम, केतन नाईक, निकिता पाटील, योजना मोहिते, गौसपाक मुलाणी, सोमनाथ टकले, बबन धुमाळ, लक्ष्मण जगदाळे, डाॅ.अतुल निकम, प्रकाश महामुनी, संगीता मासाळ, गोरक्ष जाधव हे सहभागी होणार आहेत तर माजी नगरसेवक महादेव जिरगे, वकिल संघाचे अध्यक्ष अँड. उल्हास माने, आदर्श शिक्षक लक्ष्मण नागणे व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण गांडुळे उपस्थित राहतील.
प्रेरणा प्रतिष्ठानच्या आदर्श दाम्पत्य पुरस्कारांचे वितरण प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे हस्ते आणि अ.भा.नाट्य परिषदेचे मंगळवेढा शाखा अध्यक्ष डाॅ.सुभाष कदम यांचे अध्यक्षतेखाली होईल.यंदाचे आदर्श दाम्पत्य पुरस्कार प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभा काळुंगे, संजीव कवचाळे व जयश्री कवचाळे , डाॅ.शाकीर सय्यद व डाॅ.शबनम सय्यद याना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सजग नागरीक संघाचे अँड.भारत पवार, कृषिभुषण अंकुश पडवळे, पत्रकार प्रमोद बिनवडे व शिवाजी केंगार उपस्थित राहणार आहेत.
या शिवार साहित्य संमेलनाचा समारोप माजी सभापती अँड.नंदकुमार पवार यांचे हस्ते व म.सा.प. पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे यांचे अध्यक्षतेखाली आणि उपनगराध्यक्ष अजित जगताप, माजी.नगरसेवक प्रविण खवतोडे, कृषिनिष्ठ शेतकरी तात्यासोा चव्हाण व शिवाजी काशिद उपस्थित राहणार आहेत.असे भरगच्च विविध कार्यक्रम होणार आहेत. असे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश जडे यांनी दिली.