राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (एनटीए) यांच्या वतीने वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी NEET 2024 परीक्षा यावर्षी 05 मे 2024 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी दि.09 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि.09 मार्च आहे. NEET 2024 फॉर्म भरण्यासाठी आपणाकडे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, फॉर्म फी किती आहे हे तर आपण पाहणार आहोतच परंतु त्याचबरोबर नीट 2024 फॉर्म भरणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी काही बाबी महत्त्वाच्या आहेत ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
ज्या मराठा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेत SEBC प्रवर्गातून आरक्षणाचे लाभ घ्यायचे आहेत त्यांनी नीट 2024 फॉर्म भरत असताना EWS (केंद्र शासनाच्या EWS च्या अटी पूर्ण होत असतील तर) मधून फॉर्म भरावा अन्यथा General मधून फॉर्म भरावा.
केंद्र शासनाच्या EWS अटी खालील प्रमाणे आहेत
1. उमेदवाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 8 लक्ष प्रतीवर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
2. त्यांच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी.
3.निवासी घर किंवा फ्लॅट चे क्षेत्रफळ 1000 चौरस फुटांपेक्षा कमी असावे.
4. प्लॉट नगरपालिका क्षेत्रात असल्यास निवासी प्लॉटचे क्षेत्रफळ 100 चौरस यार्डांपेक्षा कमी असावे.
5. प्लॉट नगरपालिका क्षेत्राबाहेर असल्यास निवासी प्लॉटचे क्षेत्रफळ 200 चौरस यार्डांपेक्षा कमी असावे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या असतील व ज्यांना ओबीसी मधूनच प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करायचे असतील त्यांनी जातीचा दाखला मिळण्यासाठी वेळ लागत असेल तरीही नीट 2024 फॉर्म Central OBC-NCL मधूनच भरावा.
हे ही तितकेच महत्त्वाचे –
सध्या नीट 2024 फॉर्म कुठल्याही प्रवर्गातून भरला तरीही नीट परीक्षेच्या निकालानंतर होणारी प्रवेश प्रक्रियेच्या वेळी आपल्याकडे त्यावेळी उपलब्ध असलेल्या कागदपत्रावर पाहिजे त्या प्रवर्गातून करता येईल.
नीट 2024 वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे-
1) दहावी मार्कलिस्ट
2) अकरावी मार्कलिस्ट
3) बारावी मार्क लिस्ट (फक्त रिपीटर विद्यार्थ्यांसाठी)
4) आधार कार्ड
5) पासपोर्ट साईज फोटो
6) पोस्ट कार्ड साईज फोटो (4*6)
7) विद्यार्थ्यांचा सहीचा नमुना
8) विद्यार्थ्यांचा डाव्या व उजव्या हाताच्या बोटांच्या ठश्याचा नमुना
9) ओबीसी बाबत केंद्रीय जात प्रमाणपत्र
10) EWS बाबत केंद्रीय प्रमाणपत्र
हे ही लक्षात घ्या –
आपणाकडे ओबीसी/ EWS केंद्रीय प्रमाणपत्र नसेल तर आपणास डिक्लेरेशन देऊन फॉर्म भरता येईल.
तसेच मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व नीट 2024 फॉर्म फी भरण्यासाठी डेबिट/ क्रेडिट कार्ड/ युपीआय किंवा रोख रक्कम
NEET 2024 फॉर्म फी –
जनरल/ एनआरआय- 1700/-₹
जनरल/ EWS / ओबीसी-NCL- 1600/-₹
एस सी/ एस टी/ दिव्यांग/ तृतीयपंथीं- 800/-₹