मंगळवेढा, दि.22 : मंगळवेढा तालुक्यातील माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज बालाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बंजारा नृत्य, स्फूर्तीदायी गीते अन् चिमुकल्यांच्या बोबड्या पण प्रेरणादायी भाषणांनी उपस्थित सर्वांची मने जिंकली.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य गणपती पवार, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार, ज्येष्ठ सहशिक्षक सुखदेव घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात शिवजयंतीस सुरुवात करण्यात आली. प्रारंभी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज व श्री बालाजी शिक्षण मंडळ बालाजीनगरचे संस्थापक स्वर्गीय लालसिंग रजपूत यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आरती कोकरे, जान्हवी जाधव, तन्वी हराळे, गौरी भोसले, अक्षता खटके, विद्या चव्हाण, शिवानी चव्हाण, पायल धनवडे, संजना चव्हाण, सारिका केळकर यांनी आपल्या स्फूर्तीदायी गीते अन् प्रेरणादायी भाषणांनी शिव विचारांचा जागर घातला.