महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून सध्या बारावीच्या परीक्षेस सुरुवात झाली असून शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळ सत्रात मराठी विषयाचा पेपर होणार आहे. मराठी विषय आपण अभ्यासपूर्ण तयारी करून सोडवला तर आपल्याला या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवता येऊ शकतात. मराठी विषयात अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी आपणासाठी मराठी विषयाची कृतीपत्रिका / उत्तर पत्रिका कशी सोडवायची हे जर आपणास सुव्यवस्थितपणे समजले तर आपण मराठी विषयात निश्चितच चांगले गुण संपादन करू शकता.
मराठी कृतीपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी
1) कृतीपत्रिका मिळाल्यानंतर कृतीपत्रिकेतील सर्व पाने व प्रश्न संख्या आहेत का ते तपासावे.
2) कृतीपत्रिकेतील उतारा कविता एकदा वाचन करावे. आकलन नाही झाल्यास दुसऱ्यांदा वाचावे मगच कृती लिहावे.
3) स्वमत/ अभिव्यक्ती कृती स्वतःच्या भाषेत लिहावे. त्यात स्वतःचे मत असावे.
4) सर्व कृती कृतीपत्रिकेतील क्रमानेच लिहावे.
5) नवीन कृती स्वतंत्र पानावर लिहावी.
6) कृती लिहिताना प्रत्येक कृतीला असणाऱ्या गुणावरून वेळेचे नियोजन करावे.
7) सर्व कृती सोडवावे अर्थात आवश्यक तेवढेच सोडवावे.
8) सुंदर हस्ताक्षरात आणि मुद्दे शूज उत्तरे लिहिली तर मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.
9) निबंधवजा उत्तर लिहिताना उत्तरातील महत्त्वाचा भाग पेन्सिलने अंडरलाईन करावे.
वर्गात अध्यापन करताना विद्यार्थ्याकडून नेहमी उत्तरे किती पाने लिहावीत असा प्रश्न उपस्थित होत असतो. त्यासाठी दीर्घोत्तरी/ लघुत्तरी असे दोन प्रश्न प्रकार असतात. सरासरी दोन गुणाची कृती असेल तर आठ ते दहा ओळी म्हणजेच अर्धे पान, तीन गुणांची कृतीसाठी बारा ते पंधरा ओळी म्हणजेच पाऊण पान, चार गुणांची कृतीसाठी 18 ते 20 ओळी म्हणजेच एक पान, आणि पाच गुणांच्या कृतीसाठी 21 ते 25 ओळी म्हणजे सव्वापान उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.
निबंध लिहिताना किमान तीन पान लिहावे. शक्यतो विद्यार्थ्यांनी कल्पनात्मक निबंध लिहिण्यास प्राधान्य द्यावे. कारण, विद्यार्थी खूप छान कल्पना करतात. कल्पनात्मक निबंध प्रकारचा विषय कसा ओळखावा. तर ज्या निबंधाच्या नावात ‘जर’, ‘तर’ शब्द आलेला असतो. तो निबंध प्रकार कल्पनात्मक असतो.
उदा. “मला लॉटरी लागली तर”
मराठी विषयाची गुण विभागणी
1) गद्य- 20
2) पद्य-. 16
3) कथा साहित्यप्रकार- 10
4) उपयोजित मराठी- 14
5) व्याकरण – 20
एकूण—————————- 80
कृतीपत्रिकेचे स्वरूप
कृती-1 गद्य विभाग (20 गुण)
अ) पाठ्यपुस्तकातील गद्य उतारा
1) आकलन कृती. -2 गुण
2) आकलन कृती. -2 गुण
3) स्वमत व अभिव्यक्ती-4 गुण
आ) पाठ्यपुस्तकातील गद्य उतारा
1) आकलन कृती. -2 गुण
2) आकलन कृती. -2 गुण
3) स्वमत व अभिव्यक्ती-4 गुण
इ) अपठित गद्य उतारा
1) आकलन कृती. -2 गुण
2) आकलन कृती. -2 गुण
कृती-2 पद्य विभाग (16 गुण)
अ) पाठ्यपुस्तकातील कविता
1)आकलन कृती. -2 गुण
2)आकलन कृती. -2 गुण
3)अभिव्यक्ती. -4 गुण
आ) पाठ्यपुस्तकातील काव्यपंक्ती अर्थ लिहिणे-4 गुण
इ) पाठ्यपुस्तकातील काव्यपंक्ती काव्यसौंदर्य किंवा रसग्रहण.-4 गुण
कृती -3) कथा साहित्यप्रकार(10 गुण)
अ) कथा साहित्यप्रकार परिचय मधील उतारा
1) य- आकलन कृती-1 गुण
र- आकलन कृती-1 गुण
2) आकलन कृती. -2. गुण
आ) कथावर आधारित कृती (4 पैकी 2 सोडवणे)
1) स्वमत कृती. -3 गुण
2) अभिव्यक्ती कृती-3 गुण
कृती-4 उपयोजित मराठी (14 गुण)
अ) आकलन कृती –( 4 पैकी 2 सोसोडवणे)- 4 गुण
आ) उपयोजन कौशल्य कृती (4पैकी 2 सोडवणे-10 गुण)
कृती -5 व्याकरण व लेखन(20)
अ) व्याकरण घटक
1) वाक्यरूपांतर- 2
2) समास- 2
3) प्रयोग- 2
4) अलंकार- 2
5) वाक्प्रचार- 2
आ) निबंध लेखन (5 पैकी 1 ) 10 गुण
अशाप्रकारे मराठी कृतीपत्रिकेत एकूण पाच घटकावर पाच कृती असतात. या सर्व कृतींचा काळजीपूर्वक अभ्यास करून, स्वरूप समजून घेऊन कृती लिहिणे अपेक्षित आहे.
मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा …
प्रा. मल्लेशा अरकेरी.
(तज्ञ मार्गदर्शक मराठी – 16 वर्षे मराठी विषयाचा अध्यापनाचा अनुभव)