परीक्षेला सामोरे जाताना….आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. साहजिकच घरात अभ्यासाचे वातावरण आहे. परीक्षा म्हटलं की ताण आला. या ताणामुळेच अनेक विद्यार्थी परीक्षेत अपेक्षित कामगिरी करू शकत नाही. मनावर दडपण न आणता परीक्षा दिली, तर आपण चांगल्या गुणांनी पास होऊ शकतो. परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर पोहोचणे गरजेचे आहे. परीक्षेस जाताना रस्त्यावर ट्रॅफिकची अडचण येऊ शकते तसेच
परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर बैठक व्यवस्था पाहून आपल्या बैठक खोली पर्यंत पोहचण्यासाठी अडचणी येऊ शकतात हे लक्षात घ्यावे.
परीक्षा दालनात प्रवेश करण्यापूर्वी व दालनात प्रवेश घेतल्यानंतर पुढील गोष्टींची दक्षता घ्यावी.1.वेळापत्रकाप्रमाणे कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे. हे वारंवार तपासणे.
2.आपल्याजवळ दोन पेन बाळगावेत व ते व्यवस्थित चालू स्थितीत आहेत काय हे पडताळून पाहावे तसेच कंपासपेटी सोबत ठेवावी.
3.मोबाईल जवळ ठेवू नये.
4. आपले चप्पल व बुट परीक्षा कक्षा बाहेर सोडावीत.
5.परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत असल्याची खात्री करावी.
6.सोबत पारदर्शक पाणी बॉटल ठेवावी.
7.उत्तर पत्रिका आपणास दिल्यानंतर उत्तर पत्रिकेची एकूण पाने व पान क्रमांक योग्य असल्याची खात्री करावी.
8.तुमच्या नंबरचा बारकोड मिळाला आहे का याची खात्री करावी तो आपल्या उत्तरपत्रिकेवर बारकोडच्या चौकटीत चिकटवून घ्यावा.
9. उत्तरपत्रिका प्रथम पानावरील माहिती लिहावी.
10.उत्तर पत्रिकेत सुवाच्च हस्ताक्षराने उत्तरे लिहावीत.
11.उत्तरपत्रिकेत खाडाखोड करू नये, चुकीचे उत्तर लिहले गेल्यास त्यावर फक्त एक आडवी रेषा ओढावी.
13. कोणताही अनुचित प्रकार करू नये.
14.आपणास प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी 10 मिनिटाचा वाढीव वेळ असल्याने त्यावेळी सर्व प्रश्न सुव्यवस्थितपणे सोडविले आहेत का याची खात्री करावी.
15. परीक्षा वेळी आपले केंद्रप्रमुख, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक यांच्या सूचनांचे पालन करावे.
परीक्षा काळात आपणास कोणताही ताणतणाव आल्यास ताणतणाव दूर करण्यासाठी बोर्डाने समुपदेशक यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याशी संपर्क साधा.
आपणास परीक्षेत यशस्वी होण्याकरिता या सर्व गोष्टींची तंतोतंत पालन करावे. स्वतःवर विश्वास ठेवा. यश आपलेच आहे.
परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
हे सुध्दा वाचा…
दहावी – बारावी परीक्षेचे टेन्शन येतेय.. आता नो टेन्शन https://zepsanvadnews.com/122/
आकडे बोलतात…
एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी
▪️विज्ञान शाखा: ७,६०,०४६
▪️कला शाखा: ३,८१,९८२
▪️वाणिज्य: ३,२९,९०५
▪️वोकेशनल: ३७,२२६
▪️आय टी आय: ४७५०
प्रा. मल्लेशा अरकेरी.( लेखक गेल्या 16 वर्षापासून शिक्षक पेशात कार्यरत आहेत.