माढा, दि.25 : आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या सूचनेनुसार लोकमंगल फाऊंडेशन व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने माढा तालुक्यातील सिना नदी काठच्या निमगांव, रिधोरे,तांदुळवाडी या पूरग्रस्त गावातील 1000 कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.यामध्ये फूड पॉकेट,पाणी बॉटल, टॉवेल, नॅपकिन, वेफर्स, बिस्किट पुडे, लहान मुलांचे उबदार कपडे आदी आवश्यक वस्तूंची मदत त्याठिकाणी जाऊन करण्यात आली.
माढा तालुक्यात सर्वात प्रथम मदत केल्याबद्दल या भागाचे आमदार अभिजित पाटील यांनी आमदार सुभाष बापू देशमुख व लोकमंगल समूहाचे आभार व्यक्त केले. सदर पूरग्रस्त गावातील नागरिकांना लोकमंगल बँकेच्या टीमच्या माध्यमातून एक हात मदतीचा लोकमंगल समूहाने दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी लोकमंगल पतसंस्थेचे संचालक शहाजी साठे,माढा तहसीलदार संजय भोसले, मंडल अधिकारी चराटे साहेब, तलाठी, ग्रामसेवक, अतुल गवळी, प्रवीण गायकवाड यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.