मंगळवेढ्यात उसळला देशभक्तीचा महापूर ; आमदार समाधान आवताडे यांचे नेतृत्वाखाली मंगळवेढेकरांची भव्य तिरंगा रॅली 

मंगळवेढा, दि.२२ ::  ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय सेनेने दाखवलेल्या शौर्य बद्दल कृतज्ञता आणि सन्मानाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा शहरामध्ये भव्य तिरंगा यात्रा रॅली काढून देशभक्तीचा नारा बुलंद करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, दूध मांगो तो खीर देंगे कश्मीर मांगे तो चीर देंगे अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.

यावेळी बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सेनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, हा नवभारत आहे – जो आपल्या शत्रूंना घरात घुसून प्रत्युत्तर देतो. पाकिस्तानसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला ठोस उत्तर देत, भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की, आपली सार्वभौमता आणि सुरक्षेचा कुणीही भंग केला तर त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल.

भारतीय सेनेच्या याच पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आज मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे हातामध्ये भारतीय तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. आपल्या देशासाठी, लाखो सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या सर्व भारतीय जवानांना सल्युट असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले आहे.

या यात्रेत आमदार आवताडे यांचेसमवेत सर्व तालुक्यातील सामाजिक,राजकीय व व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील अनेक देशप्रेमी मंगळवेढाकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून भारतीय सेनेच्या कार्याला सलाम करत उत्स्फूर्तपणे सहभागी झायाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here