अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ही लागणार कागदपत्रे ; ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी आत्ताच संग्रही ठेवा

श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ -झेप संवाद न्यूज

मंगळवेढा, दि.18 : महाराष्ट्रात यावर्षी सर्व जिल्ह्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश प्रवेश प्रक्रियेद्वारे होणार आहे. या प्रक्रियेत प्रवेशाचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने प्रक्रियेने विद्यार्थ्यांनी स्वतः भरावयाची असून यासाठी त्यांच्याकडे विविध कागदपत्रे लागणार असून ही कागदपत्रे कोणती आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवण्यात यावी-

1. इयत्ता दहावी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक

2. इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत

3. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला

4. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

5. EWS पात्रता प्रमाणपत्र

6. दिव्यांग प्रमाणपत्र

7. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र

8. आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र

9. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र

10. अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र.

11. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक.

12. हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण पत्र (Transfer order and joining letter)

(राज्य शासन/केंद्र सरकार/ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here