मंगळवेढा, दि. 20: जुन्या पेन्शन साठी पेन्शन फायटर आक्रमक झाले असून आम्हाला डीसीपीएस, एनपीएस, जीपीएस नको तर आम्हाला फक्त जुनी पेन्शन हवी आहे अशी मागणी करत व्होट फार ओपीएस या संकल्प यात्रेला नागपूर येथून प्रारंभ झालेला आहे. संकल्प यात्रेत 77 कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले असून अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असा नारा देत ही संकल्प यात्रा आता आझाद मैदान मुंबई च्या दिशेने आगेकूच करत आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी प्रयत्न करत आहे,लढत आहे परंतु आजपर्यतच्या लढ्यात फक्त आणि फक्त आश्वासने मिळाली आहेत आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्रात सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन सुरू करावी या एकमेव मागणीसाठी पेन्शन संकल्प यात्रा सुरू करण्यात आलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शोधून नागपूर येथून संकल्पना यात्रेस सुरुवात झाली असून ती आता तळेगाव, वर्धा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सिंदखेड राजा छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, पालघर, ठाणे या ठिकाणावरून मार्गक्रमण करत दि.28 फेब्रुवारी 2024 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे पोहचणार आहे.
लाखोंच्या संख्येने कर्मचारी आंदोलने करीत आहेत. जे कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना लागू करतील सरकार सत्तेवर स्थापन करण्याचा निर्धार सोळा लाख कर्मचारी व कुटुंबीयांनी केलेला आहे त्यामुळे या विषयाला आता शासनाने गांभीर्याने घेऊन राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची गरज आहे तेव्हाच हे वादळ थांबणार आहे.
शासनाने कुठलाही भेदभाव न करता सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा व्होट फॉर ओ पी एस हे एकमेव असे साधन आमच्याकडे शिल्लक राहणार आहे आणि याची प्रचिती अनेक राज्यांमध्ये आलेली आहे.
श्री.वितेश खांडेकर,
राज्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
1नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीतील कर्मचाऱ्यांना नुकतीच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली परंतु एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून आम्हालाही योग्य तो न्याय द्यावा.
श्री.दिगंबर तोडकरी,
राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सोलापूर