छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मरवडे भूषण रामचंद्र कोळी व प्रा.डॉ . धनाजी मासाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मरवडे भूषण पुरस्काराचे मानकरी भारत घुले , गोविंद चौधरी , प्रा. डॉ. संतोष सुर्यवंशी, पै. दामोदर घुले , भिमराव घुले तसेच या मरवडे भूषण पुरस्कार प्राप्त कुटुंबातील धोंडीराम गायकवाड, सुनील रमेश शिंदे इत्यादी मंडळींचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते अवकाशात बलून सोडण्यात आला.
यावेळी माजी सरपंच अशोक पवार, राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी, दादासाहेब पवार, अजितसिंह पवार, शिवाजीराव (बटू) पवार, जगन्नाथ मासाळ यांच्यासह यात्रा कमेटीचे डॉ. माणिक पवार, सुभाष भुसे, संभाजी रोंगे, राजाराम कालिबाग, तानाजी सुर्यवंशी तसेच युवा नेते धन्यकुमार पाटील, पोलिस पाटील महेश पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणपती पवार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छत्रपती परिवाराचे संस्थापक तथा मरवडे फेस्टिव्हलचे संयोजक सुरेश पवार यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.