मंगळवेढा, दि.11 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य संस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत सोलापूर ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन सोलापूर येथील रंगभवन येथे करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवात मंगळवेढा येथील स्व.संजय-सविता स्मृति सार्वजनिक वाचनालय कृष्णनगर मंगळवेढाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी वाचन संस्कृती टिकवून ती वृद्धिंगत करण्यासाठी करीत असलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना गौरव पत्र देऊन मनोरमा परिवाराचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, मसापचे पद्मकार कुलकर्णी, ‘ग्रंथ मित्र’कुंडलिक मोरे, ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पवार , विलास शहा , साहेबराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .या गौरवाबद्दल व वाचनालयाच्या उत्कृष्ट कामकाजा निमित्त संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.