शाब्बास ; स्वरा कोकरे ठरली मंगळवेढ्याची सर्वोत्कृष्ट बालवक्ता

मंगळवेढा, दि.०३ : शिवजयंती निमित्त मंगळवेढा शहरातील नगरपालिका केंद्रातील सर्व शाळांची केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा कै. नानासाहेब नागणे प्रशाला मंगळवेढा येथे पार पडली. या स्पर्धेचे मोठ्या गटाचे पारितोषिक नगरपालिका मुलांची प्राथमिक शाळा नं,1 मंगळवेढा या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी स्वरा दीपक कोकरे हिने पटकावले. स्वरा कोकरे ने हा किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. आपल्या पहाडी व दमदार आवाजाच्या जोरावर तसेच आशयपूर्ण वक्तृत्वाने तिने हा किताब पटकावला.

याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष बाळदादा नागणे, हर्षद डोरले उपस्थित होते. परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर मोरे व अशपाक काझी यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचे संयोजन चंद्रकांत देसाई व अर्जुन अवताडे यांनी केले होते. यशस्वी विद्यार्थिनीचे प्रशासनाधिकारी अर्चना जनबंधू, मुख्याध्यापक गणेश सालुटगी , वर्गशिक्षक यशवंत वाघमोडे, सहशिक्षिका श्रीमती बागेवाडी, सहशिक्षक प्रशांत कांबळे, शिवाजी फाळके व श्रीमंत सोलंकर व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री मुरडे सर्व सदस्य व पालकांनी तिचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here